पुणेकर तरुणाचा प्रताप, स्वतःच्याच बंगल्याला अन् गाडीला आग लावली; नंतर तमाशाला जाऊन बसला

पुणे: आजकाल रागाच्या भरात कोण काय करेल याचा नेम नाही. अनेकदा रागाच्या भरात भीषण कृत्य घडलेले आपण पाहतो. मात्र शिरूर तालुक्यातून एक विचित्र घटना समोर आली आहे. रागाच्या भरात एका तरुणाने स्वतःचा बंगला आणि चारचाकी गाडी पेटवून दिली असल्याचे समोर आले आहे. त्यांच्या गावात असणाऱ्या यात्रेच्या दिवशी हा प्रकार समोर आला आहे. शिरूर तालुक्यातील पिंपळे जगताप येथे हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित तरुणाला ताब्यात घेतले आहे. बंगला आणि गाडी पेटवून देऊन हा तरुण तमाशाला निघून गेला. शिक्रापूर पोलीस व नागरिकांनी तातडीने आग विझवत बंगला व कार पेटवणाऱ्या युवकाला ताब्यात घेतले आहे. प्रज्योत तांबे असे तरुणाचे नाव आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, पिंपळे जगताप येथील बोत्रेवस्ती येथील प्रज्योत तांबे या युवकाचे आई वडील वाजेवाडी मध्ये गेलेले होते. प्रज्योत याने बंगल्याच्या बाजूला असलेली एम एच १२ ए जि ९४१८ हि कार पेटवून देत बंगल्यामध्ये जाऊन बंगल्यात देखील आग लावली. घटनेची माहिती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गाडीने पेट घेतल्याने चारही टायर, एसीच्या सिलेंडरचा स्फोट झाला, तर आग लावणारा युवक फरार झाला.

वाचाः रिल्सचा नाद जीवावर बेतला; परभणीतील ‘त्या’ भीषण अपघातातील दुसऱ्या विद्यार्थ्यांचाही मृत्यू

बंगल्यात आगीचा भडका उडताच शेजारी असणाऱ्या नागरिकांनी पाण्याची मोटार चालू करुन आग विझवली. मात्र तोपर्यंत संपूर्ण कार, बंगल्यातील सर्व धान्य, कपडे यांसह काही वस्तू जळून खाक झाल्या होत्या. मात्र जाळपोळ करणारा प्रज्योत तांबे गावामध्ये यात्रेत सुरु असलेला तमाशा पाहत बसल्याचे पोलिसांना समजताच पोलिसांनी त्याला तमाधमध्ये जाऊन प्रज्योत याला ताब्यात घेतले आहे.

वाचाः कुनोतून आली वाईट बातमी; मादी चित्त्याची प्रकृती खालावली, किडनीला संसर्ग, डॉक्टर म्हणतात…

मात्र, या घटनेने नागरिकांनी बघण्यासाठी गर्दी करत काही वेळाने ही अग विझवली देखील. मात्र तरुणाने रागाच्या भरात हे कृत्य केल्याची माहिती समोर येत आहे. पण त्याने असं का केलं हे मात्र अद्याप कळलं नाहीये.

वाचाः ७० वर्षीय सासरेबुवांचे २८ वर्षीय सुनेवर मन बसलं, मंदिरात उरकलं लग्न; फोटो पाहून लोकांचं डोकं चक्रावलं

Source link

Pune crimepune live newspune news todaypune youth set car on fireपुणे ताज्या बातम्यास्वतःचा बंगला पेटवला
Comments (0)
Add Comment