जमुना यांनी अभिनयासोबतच राजकारणातही आपलं नशीब आजमावलं होतं. त्या १९८९ सालच्या निवडणुकीत त्या खासदार म्हणूनही निवडून आल्या होत्या. त्या आंध्रप्रदेशमधील राजमुंद्री येथून खासदार म्हणून काम पाहत होत्या. त्यांनी अभिनयात अनेक दिग्गज अभिनेत्यांसोबत काम केलं आहे. एन ती रामा राव आणि अक्किनेनी नागेश्वर राव यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत त्यांनी मुख्य अभिनेत्री म्हणून काम केलं आहे. त्यांनी १९५२ सालच्या ‘पट्टिल्लू’, ‘तेनाली रामकृष्णा’, ‘गुंडम्मा कथा’, ‘कलेक्टर जानकी, श्री कृष्णा तुलाबाराम’ आणि ‘पुलरंगाडू’ यांसारख्या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती.
जमुना यांच्या मृत्यूवर अभिनेता महेश बाबू याने श्रद्धांजली वाहिली आहे. त्याने ट्विटरवर श्रद्धांजली वाहत लिहिलं, ‘जमुना गरु यांच्या निधनाबद्दल ऐकून दुःख झाले. त्यांच्या सर्व प्रतिष्ठित भूमिकांसाठी आणि इंडस्ट्रीतील अतुलनीय योगदानासाठी त्यांना नमन. त्यांच्या कुटुंबियांना आणि प्रियजनांप्रती मी शोक व्यक्त करतो.