आई कुठे काय करते: साजरं होणार अभि-अनघाच्या मुलीचं बारसं, वाचा अरुंधतीने काय ठेवलं नातीचं नाव

मुंबई- छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवत आहे. मालिकेत सध्या आनंदाचं वातावरण आहे. सध्या अरुंधतीच्या आयुष्यात आनंद देणाऱ्या गोष्टी घडत आहेत. अरुंधतीला आशुतोषने लग्नासाठी मागणी घातली होती आणि तिने त्यासाठी होकारही कळवळा आहे. तिच्या या निर्णयावर अप्पांनीही तिला पाठिंबा दिला आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी देशमुखांच्या घरात एका चिमुकल्या परीचं आगमन झालं. अभिषेक आणि अनघा यांच्या मुलीच्या येण्याने घरातील सगळं वातावरण चैतन्यमय झालं. आता पुन्हा एकदा देशमुखांचं घर आनंदाने भरणार आहे. अभि आणि अनघाच्या मुलीचं लवकरच बारसं होणार आहे आणि आपल्या नातीचं नाव ठेवण्याची जबाबदारी ही आता अरुंधतीवर आहे. वाचा अरुंधतीने आपल्या लाडक्या नातीचं नाव काय ठेवलंय.

प्रेक्षकांना अरुंधती आणि आशुतोष यांच्या लग्नाची घाई लागली आहे. अरुंधतीने घरी तिच्या या निर्णयाबद्दल काहीही सांगितलेलं नाही. अनिरुद्ध या गोष्टीवर इतरांना भडकावताना दिसतोय. तर अरुंधती नातीच्या बारशाच्या दिवशी सगळ्यांना आपला निर्णय सांगणार का असा प्रश्न प्रेक्षकांसमोर आहे. त्यात नुकत्याच प्रदर्शित करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये अरुंधती बाळाचं नाव ठेवताना दाखवण्यात आली आहे. चिमुकलीच्या बारशासाठी संपूर्ण घर सजलेलं आहे. काही मोजक्याच पाहुण्यांसोबत हा कार्यक्रम पार पडणार आहे. सुरुवातीला इशा बाळाच्या कानात तिचं नाव सांगते. तर इतर सगळ्याजणी तिच्या पाठीवर मारताना दिसतात. अनघाची आई इशाला बाळाचं नाव विचारते. त्यावर यश बाळाचं नाव असलेली पाटी घेऊन येतो. अरुंधती आणि यश पाटी उघडून नाव दाखवतात. अरुंधतीने आपल्या नातीचं नाव जानकी ठेवलं आहे.


आता घरातले तिच्या या नावाचं कौतुक करताना दिसतायत. तर अनिरुद्ध त्यावर नाक मुरडताना दिसतोय. आता कार्यक्रमानंतर अरुंधती आपल्या आणि आशुतोषच्या लग्नाबद्दल सगळ्यांना सांगणार का याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. अरुंधतीच्या या निर्णयाचा घरातल्यांवर काय परिणाम होणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत.



Source link

aai kuthe kay karteaai kuthe kay karte arundhatiaai kuthe kay karte latest episodeaai kuthe kay karte serial updateaai kuthe kay karte upcoming episodearundhati give name to granddaughterarundhati granddaughter namearundhati granddaughter naming ceramony
Comments (0)
Add Comment