वाचा: Airtel युजर्सना झटका, वाढली सर्वात स्वस्त प्लानची किंमत, पाहा डिटेल्स
कंपनीने अधिकृतपणे पंड्याला ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त केले आहे, अशी अपेक्षा आहे की, हार्दिक पांड्या थेट पोकोच्या उत्पादनांची जाहिरात करेल. आगामी X5 Series च्या प्रमोशनमध्ये हार्दिक सहभागी होण्याची अपेक्षा आहे. कंपनीचा दावा आहे की, स्मार्टफोनच्या X5 लाइनअपला मागील व्हेरियंटच्या तुलनेत नवीन हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर अपग्रेड मिळतील.
वाचा: महागड्या 5G स्मार्टफोनवर ३२ हजार रुपयांचा ऑफ, फोनचे फीचर्स A1, पाहा डिटेल्स
Poco X5 Pro लाँचची तारीख:
चीनी स्मार्टफोन कंपनी Poco ६ फेब्रुवारीला नवीन Poco X5 Pro स्मार्टफोन लाँच करणार आहे. स्मार्टफोनच्या नवीन प्रमोशनल पोस्टरवरून ही माहिती मिळाली आहे. मायक्रोब्लॉगिंग वेबसाइट ट्विटरवरील एका युजर्सने पोको एक्स 5 प्रो चे पोस्टर शेअर केले, जे शाहरुख खान स्टारर फिल्म पठाणच्या स्क्रीनिंग दरम्यान मध्यांतर दरम्यान दाखवले गेले होते. हा हँडसेट भारतात ६ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ५.३० वाजता लाँच होईल. ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर फोन उपलब्ध करून देण्याची माहिती आधीच समोर आली आहे.
Poco X5 Pro ची भारतात किंमत:
Poco X5 Pro स्मार्टफोन देशात २१,००० ते २३,००० रुपयांच्या दरम्यान लाँच केला जाईल. हा हँडसेट देशात ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज आणि ८ जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज व्हेरियंटमध्ये लाँच होण्याची शक्यता आहे.
Poco X5 Pro काय असेल खास ?
आगामी Poco X5 Pro बद्दल अशाही बातम्या आहेत की, आगामी Poco फोन Redmi Note 12 Speed Edition चे रीब्रँडेड व्हर्जन असेल. हँडसेटमध्ये २० Hz पर्यंत रिफ्रेश रेटसह ६.६७ इंच फुलएचडी+ओएलईडी पॅनेल असेल. स्क्रीन HDR10+ ला सपोर्ट करेल. Poco X5 Pro मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप उपलब्ध असेल. हँडसेटला १०८ मेगापिक्सेल प्रायमरी, ८ मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड आणि २ मेगापिक्सेल मॅक्रो सेन्सर मिळू शकतो. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा फ्रंट सेन्सर असण्याची अपेक्षा आहे.
वाचा: iPhone खरेदीची इच्छा होणार पूर्ण, या मॉडेल्सवर मिळतोय तगडा डिस्काउंट