महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे सावट; ‘या’ जिल्ह्यांवर आस्मानी संकट; वाचा हवामान विभागाचा अंदाज

मुंबईः महाराष्ट्रातील काही भागात कडाक्याची थंडी असतानाच काही जिल्ह्यात मात्र पावसाचे सावट आहे. हवामान विभागाने २९ जानेवारीनंतर राज्यात थंडीची लाट येण्याची शक्यता वर्तवली असतानाच आता हवामान विभागाने पावसाचंही भाकित केलं आहे. पुढील दोन ते तीन दिवस राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे, असं हवामान विभागानं म्हटलं आहे.

उत्तर आणि पूर्व भागातून येणाऱ्या वाऱ्यांमुळं कमी दाबाचे क्षेत्र तयार झालं आहे. त्यामुळं तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान, बुधवारी- गुरुवारीदेखील विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली होती.

वाचाः महाराष्ट्र हादरला! २३ वर्षांच्या तरुणीचे डॉक्टर होण्याचे स्वप्न भंगले, प्रेमसंबंधातून घरच्यांनीच संपवले
पुढील काही दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसंच, किमान तापमानात किरोकोळ वाढ होईल. परंतु दिवसाच्या तापमानात अशंतः घट होण्याची शक्यता आहे. अशातच आता पुढील दोन ते तीन दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

वाचाः पोलिसांच्या हाती लागली गोपनीय माहिती, हॉटेलमध्ये धाड टाकताच सापडलं मोठं घबाड

२९ ते ३१ जानेवारीदरम्यान मध्य भारतात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तसेच पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, बुलडाणा व वाशीम या चार जिल्ह्यात तुरळक ठिकाणी साधारण पावसाची शक्यता आहे.हवामान विभागाच्या अंदाजानुसार २९ जानेवारीनंतर महाराष्ट्रात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. तर ही थंडीची लाट २ फेब्रुवारीपर्यंत कायम राहिल, अशीही शक्यता आहे. गुजरातमार्गे येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे पालघर, उत्तर मुंबई आणि ठाण्यावर अधिक परिणाम जाणवते.

महाराष्ट्रात थंडीची लाट

हवामान विभागाच्या अंदाजानुसार २९ जानेवारीनंतर महाराष्ट्रात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. तर ही थंडीची लाट २ फेब्रुवारीपर्यंत कायम राहिल, अशीही शक्यता आहे. गुजरातमार्गे येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे पालघर, उत्तर मुंबई आणि ठाण्यावर अधिक परिणाम जाणवते.

वाचाः हृदयद्रावक! देवदर्शनावरुन परतताना ६ वर्षीय मुलासह मामाचा अपघाती मृत्यू; लहान मुलगा गंभीर

Source link

maharashtra rain alertMaharashtra weather alertmaharashtra weather newsmaharashtra weather news todayweather forecast in maharashtraweather in my location
Comments (0)
Add Comment