दारुचा ग्लास घेऊन थिरकणाऱ्या कंगनाचा Video Viral, लोकांनी विचारलं- ‘आता कुठे गेले संस्कार’

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत सध्या तिच्या इमर्जन्सी सिनेमामुळे चर्चेत आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात देशामध्ये लावलेल्या आणीबाणीवर आधारीत हा सिनेमा आहे. सिनेमात कंगनानं इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे. इमर्जन्सी सिनेमाचं चित्रीकरण पूर्ण झाल्यानिमित्ताने अभिनेत्रीने एका पार्टीचं आयोजन केलं होतं. त्या पार्टीतील कंगनाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी तिच्यावर टीका करायला सुरुवात केली आहे.

पठाणची त्सुनामी सुरुच, दुसऱ्या दिवशीच पार केले १०० कोटी

काय आहे व्हिडिओ

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओ हा कंगनानं इमर्जन्सी सिनेमाच्या रॅपअप पार्टीमधला आहे. या पार्टीमध्ये कंगनानं काळ्या रंगाचा ड्रेस घातलेला दिसत आहे. त्यात ती अतिशय ग्लॅमरस दिसत आहे. व्हिडिओमध्ये कंगना हातात दारुचा ग्लास घेऊन प्रसिद्ध पंजाबी गायक दिवंगत सिद्धू मुसेवाला याच्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. कंगानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. या व्हिडिओवरुन नेटकऱ्यांनी कंगनाला लक्ष्य करत तिच्यावर कडाडून टीका केली आहे.


कंगनाचा हा व्हिडिओ पाहिल्यावर अनेकांनी तिला खडेबोल सुनावले आहेत. अनेकांनी ज्या गाण्यावर कंगना डान्स करत आहे, ते पार्टीमध्ये वाजवलं जाणारं गाणं आहे का, असा प्रश्न उपस्थित करत तिच्यावर टीकेचा भडीमार केला आहे.

देशासाठी काय करू शकतो.. शाहरुखने ‘पठाण’ स्टाइलमध्ये सांगितलं

एका नेटकऱ्यानं लिहिलं की, ‘ताई एकदा संस्कार, संस्कृती, हिंदूत्व याचा तरी विचार करायचा होता. प्रेक्षकांना जे सांगतेच ते विसरून जातेस का?’ तर दुसऱ्याने लिहिलं की, ‘बॉलिवूडची ही संस्कारी अभिनेत्री आहे असं वाटतं होतं.’ ‘हिंदू धर्म आणि संस्कृतीचं पालन करत भजन-कीर्तनात दंग एक महिला’, अशी प्रतिक्रिया एका नेटकऱ्यानं लिहिली. दरम्यान, कंगनाच्या इमर्जन्सी सिनेमात मिलिंद सोमण, श्रेयस तळपदे यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

दिग्दर्शनात अजय नंबर वन, भोलाचं तब्बू कडून तोंडभरुन कौतुक



Source link

emergency movieKangana Ranautkangana ranaut controversykangana ranaut instagramkangana ranaut newskangana ranaut trollkangana ranaut videoकंगना रणौतकंगना रणौत इन्स्टाग्रामकंगना रणौत ट्रोल
Comments (0)
Add Comment