मुरादाबाद येथून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर इल्मा अफरोजने सेंट स्टीफन्स, दिल्ली येथे प्रवेश घेतला. तेथून तिने तत्त्वज्ञानात पदवीचे शिक्षण घेतले. सेंट स्टीफनमध्ये घालवलेल्या वर्षांना तिच्या आयुष्यातील सर्वोत्तम काळ मानते, जिथे तिला खूप काही शिकायला मिळाले. इल्माने घेतलेल्या प्रचंड मेहनतीमुळे तिला ऑक्सफर्ड विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळाली आणि तेथून तिने पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.
इल्माकडे त्यावेळी परदेशात जाण्यासाठी तिकीटासाठी पैसे नव्हते. यासाठी तिने गावातील चौधरी दादांची मदत घेतली. तिला ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीची स्कॉलरशिप मिळाली. पण खर्च पूर्ण करण्यासाठी तिने शिकवणी तसेच मुलांना संभाळण्याचे काम हातात घेतले. दरम्यान, ती आता परदेशात राहणार असून भारतात परतणार नसल्याचे तिच्या गावकऱ्यांनी तिच्या आईला सांगायला सुरुवात केली होती.
पोस्ट ग्रॅज्युएशननंतर, इल्मा अफरोज एका स्वयंसेवक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी न्यूयॉर्कला गेली. तिथे तिला फायनान्शिअल इस्टेट कंपनीत उत्तम नोकरीची ऑफर मिळाली. पण आपल्या शिक्षणावर आईचा आणि देशाचा हक्क आहे, असे तिला सतत वाटायाचे. म्हणूनच भारतात परतून तिने यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. २०१७ मध्ये, इल्माने नागरी सेवा परीक्षेत २१७ वा क्रमांक मिळविला. तेव्हा ती २६ वर्षांची होती. सध्या ती शिमल्यात एसपी एसडीआरएफ म्हणून तैनात आहेत.