मुंबई : प्रत्येकजण आपल्या आईच्या अतिशय जवळ असतो. आईबाबतच्या भावना शब्दातही व्यक्त केल्या जाऊ शकत नाही. पण एक गायक आपल्या आईबद्दलच्या भावना वेगळ्या रुपात शेअर करताना दिसतो. या गायकाच्या गळ्यात त्याच्या आईचं मंगळसूत्र असतं. त्यामागे काय आहे कारण? गायकाने स्वत: एका मुलाखतीमध्ये याबाबत माहिती दिली होती.
आईचं मंगळसूत्र गळ्यात घालणाऱ्या या गायकाचं नाव पलाश सेन आहे. पलाश त्याच्या आईच्या अतिशय जवळ आहे. पलाशची आई लाहौरमधून जम्मूपर्यंत पायी त्यांच्या ४ वर्षांच्या भावासोबत आली होती. हैराण करणारी बाब म्हणजे त्यावेळी त्या केवळ आठ वर्षांच्या होत्या. इतक्या लहान वयात एकटं राहून त्यांनी पुढे एमबीएसचं शिक्षण घेतलं. पलाशचं त्यांच्या आईशी अतिशय घट्ट नातं आहे. पण त्याच्या वडिलांच्या मृत्यूनंतर असं काही झालं, की पलाशने आईचं मंगळसूत्र घालण्यास सुरुवात केली.
हेही वाचा – श्रेयस तळपदेकडे कधी सँडविच घेण्यासाठीही नव्हते पैसे, आज एका सिनेमासाठी घेतो कोट्यवधी; ‘तुझी माझी रेशीमगाठ’साठी किती आहे फी?

वडिलांच्या मृत्यूनंतर पलाशच्या आईने मंगळसूत्र काढलं होतं. त्यांनी मंगळसूत्र घालणं बंद केलं. त्यानंतर आईचा आशीर्वाद समजून पलाशने आईचं तेच मंगळसूत्र घालण्यास सुरुवात केली. तो स्टेजवर गेल्यानंतरही तेच मंगळसूत्र घालून स्टेज शो करतो. हे मंगळसूत्र म्हणजे आईचा आशीर्वाद सोबत असल्याचं जाणवतं, अशा भावना त्याने मुलाखतीवेळी व्यक्त केल्या होत्या. तो नेहमीच स्टेजवर आईचं मंगळसूत्र घालून परफॉर्मन्स करताना दिसतो.
हेही वाचा – ‘तारक मेहता’मधील सोनू खऱ्या आयुष्यात अतिशय बोल्ड, भिडेच्या ग्लॅमरस लेकीची चर्चा!
पलाश १९९८ पासून त्याचा यूफोरिया बँड चालवतो. त्याशिवाय २००१ मध्ये त्याने अभिनय क्षेत्रातही डेब्यू केला होता.