माऊलींच्या इंद्रायणीचं पावित्र्य धोक्यात; प्रदूषित पाण्यामुळे नदीवर आला पांढरा फेस

पुणे : इंद्रायणी नदी म्हणजे वारकऱ्यांसाठी एक श्रद्धास्थान आहे. संत ज्ञानेश्वर महाराज माऊलींची समाधी आळंदीत आहे. यामुळे आळंदीत येणारा प्रत्येक वारकरी हा नदीची पूजा आरती करतो. यामुळे वारकऱ्यांमध्ये इंद्रायणी नदीचं खूप महत्त्व आहे. पण या इंद्रायणी नदीच्या पाण्यावर पांढरा फेस आल्याने नदीचे पावित्र्य धोक्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. एवढचं नव्हे तर परिसरात राहणाऱ्या नागरिकांचे आणि वारकऱ्यांचे आरोग्यही धोक्यात आले आहे.

इंद्रायणी नदीचा उगम हा लोणावळा परिसरातून झाला. ही नदी अनेक गावं, शहरं पार करत आळंदीतून पुढे वाहत जाते. मात्र पिंपरी चिंचवडमधील औद्योगिक वसाहतीचे असणारे मैलायुक्त पाणी हे इंद्रायणी नदीला प्रदूषित करत दिसून येत आहे. वारकऱ्यांनी याबाबत प्रशासनाला अनेकदा निवेदन देऊनही प्रशासनाकडून याबाबत कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. या प्रदूषित पाण्यामुळे इंद्रायणी नदीवर पांढरा फेस आला आहे.

इंद्राणीला आधीच जलपर्णीने वेढा घातलेला आहे. त्यातच अचानक आलेला हा पांढरा फेस नागरिकांसाठी त्रासदायक ठरणारा आहे. औद्योगिक प्रशासनाला सांडपाणी आणि रसायनयुक्त पाणी सोडण्याबाबत स्थानिक नागरिकांनी अनेकदा निवेदनंही दिलेली आहेत. मात्र, त्याचा काहीही परिणाम होताना दिसत नाहीए. यामुळे इंद्रायणी नदी मोठ्या प्रमाणावर प्रदूषित झाली आहे. प्रदूषणामुळे इंद्रायणीच्या काठी राहणाऱ्या नागरिकांना डास, कीटक यांचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

प्रजासत्ताक दिनी शाळकरी मुलांना जुंपून भरवली बैलगाडा शर्यत; मुख्याध्यापकांच्या नावाने पळवली बारी

प्रत्येक वर्षी आषाढी आणि कर्तिकीला इंद्रायणी नदी काठी वैष्णवांचा मेळा असतो. राज्यभरातून वारकरी आळंदीत ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनासाठी येतात. मात्र इंद्रायणीचे हे रूप पाहून त्यांना देखील वाईट वाटतं. प्रशासनानं इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करावी आणि वारकऱ्यांना स्वच्छ आणि आरोग्यदायी पाणी मिळावं, अशी मागणी वारकऱ्यांनी केली आहे.

Shiv Sena News : संजय राऊत यांची एक भूमिका अन् कसब्यातील शिवसेना

Source link

indrayani riverindrayani river pollutionindrayani river puneindrayani river pune newsPune newssant dnyaneshwar maharaj
Comments (0)
Add Comment