शिवसेनेतून शिंदे गटाने बंड पुकरल्यानंतर शिवसेनेच्या शिंदे गटाकडून आपलीच शिवसेना खरी असल्याचा दावा करत शिवसेनेच्या अनेक शाखांवर कब्जा केला आहे. या शिवसेनेच्या शिंदे गट आणि ठाकरे गट या दोघांमध्ये स्वत:चा गट ही खरी शिवसेना असल्याचे सिद्ध करण्यासाठी दावे केले जात आहेत. त्याच दरम्यान ठाण्यात शिंदे गटाकडून अनेक शिवसेनेच्या शाखा बळकावल्या गेल्याचा देखील आरोप करण्यात आला आहे. हे सगळे होत असतानाच आता थेट धर्मवीर आनंद दिघे यांच्या निवासस्थानालाच बाळासाहेबांची शिवसेना आनंदआश्रम असे नाव दिल्याने चर्चांना उधाण आले आहे.
धनंजय देसाईसह सगळेच आरोपी निर्दोष मग मोहसीन शेखला कुणी मारलं? मौलवींचा सवाल
शिवसेना नावावरून सध्या रस्सीखेच जरी सुरू असली तरी या दाव्यांवर सर्वोच्च न्यायलय व निवडणूक आयोगातही सुनावणी सुरु आहे. स्थानिक पातळीवर दोन्ही गटात संघर्ष दिसतो. कार्यालयांवर प्रत्येक गट आपलाच दावा करत आहे. ठाणे शहरातील शिंदे सेनेचे मुख्यालय असलेले आनंद आश्रमचे नाव बदलण्यात आले आहे. आनंद दिघे यांच्या जयंती दिनी या कार्यालयाला नवे नाव दिले आहे.
विदर्भाच्या कापूस पंढरीत तुरीला झळाळी, अकोल्याच्या बाजार समितीत मिळाला सर्वाधिक भाव
उद्धव ठाकरे गुरुवारी ठाणे दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी आनंद दिघे यांच्या पुतळ्याला हार घातला. जैन समाजाचा कार्यक्रम हजेरी लावली. आरोग्य शिबिरात गेले. पण धर्मवीर आनंद दिघे यांच्या आनंद आश्रममध्ये गेले नाही. सत्ता संघर्षानंतर शिंदे गटाकडून ठाण्यातील आनंद आश्रम नाव बदले आहे. बाळासाहेबांची शिवसेना आनंद आश्रम असं आनंद आश्रमला नव्याने नाव देण्यात आलेल आहे. बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचं कार्यालय या ठिकाणी आहे. ठाणे शहर किंवा इतर ठिकाणांवरून अनेक जण आपले प्रश्न, समस्या व कामे घेऊन या ठिकाणी येत असतात.
भारताच्या पराभवाचा टर्निंग पॉइंट नेमका ठरला तरी काय, सामना हातून कधी निसटला जाणून घ्या …
आनंद दिघेंना अभिवादन करण्यासाठी शक्ती स्थळावर शिंदेगटाआधी ठाकरेगट; राजन विचारेंचाही सणसणीत टोला