डॉ. दिलीप मालखेडे पुणे येथील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे यांत्रिकी अभियांत्रिकी विषयाचे प्राध्यापक होते. राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी डॉ. मालखेडे यांची पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी ही नियुक्ती केली होती. डॉ. मालखेडे हे अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद येथे सल्लागार-१ या पदावर प्रतिनियुक्तीवर काम करीत होते. मालखेडे यांनी अमरावती येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून मेकॅनिकल इंजिनिअरिंग या शाखेतून पदवी तसेच पदव्युत्तर पदवीचे (एमई) शिक्षण घेतले.
मुंबई आयआयटी मधून त्यांनी संशोधन कार्य करीत पीएचडी प्राप्त केली होती. मालखेडे यांना तीन दशकाहून अधिक शैक्षणिक आणि तीन वर्ष उद्योग क्षेत्रात कार्याचा अनुभव होता. माजी कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांचा कार्यकाळ दिनांक १ जून २०२१ रोजी संपल्यामुळे हे कुलगुरूपद रिक्त होते. नवीन कुलगुरू निवडीची प्रक्रिया वेळेवर सुरू न झाल्याने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले सर यांच्याकडे पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता.
डॉ. मुरलीधर चांदेकर यांचा कार्यकाळ संपल्यानंतर नवीन कुलगुरु निवडण्याकरीता समितीचे गठन करण्यात आले. समितीकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. या पदाकरिता एकूण तब्बल १२० अर्ज समितीकडे प्राप्त झाले होते. एकुण अर्जातून छाननी अंती २० अर्ज निवडण्यात आले होती या २० अर्जांपैकी ५ जणांच्या नावांची यादी निवड समितीने राज्यपाल भगतसिंग कोसारी यांच्याकडे पाठवली होती.
यामध्ये डॉ. दिलीप मालखेडे, दिल्ली येथील डॉ. उमेश कदम, अमरावती येथील डॉ. दीपक धोटे, औरंगाबाद येथील डॉ. कारभारी काळे, वाशीम येथील डॉ. नंदकिशोर ठाकरे यांचा समावेश होता. यातून मालखेडे यांची कुलगुरुपदी निवड करण्यात आली होती.
कुलगुरू डॉक्टर दिलीप मालखेडे यांनी आपल्या कार्यकाळात अमरावती विद्यापीठाला उच्च स्तरावर नेऊन ठेवण्यासाठी अनेक प्रयत्न केले त्यासाठी त्यांनी अनेक शैक्षणिक संस्था विद्यापीठे यांच्यासोबत करार केला होता. नवीन शिक्षण पद्धतीनुसार विद्यार्थ्यांना शिकता यावे याकरीता त्यांनी अमरावती विद्यापीठात क्रेडिट बेस्ट चॉईस सिस्टीम सुद्धा लागू केली होती आजारी असताना सुद्धा डॉक्टर मालखेडे यांनी सीबीसीएस साठी कसोटीने प्रयत्न करत प्राध्यापक कांची ट्रेनिंग घेतले होते.
मालखेडे यांच्या निधनाने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ व शैक्षणिक क्षेत्राची फार मोठी हानी झाली आहे. कुलगुरू म्हणून रुजू झाल्यानंतर विद्यापीठाच्या शैक्षणिक आणि सर्वांगीण विकासामध्ये त्यांनी जो पुढाकार घेतला आणि अमरावती विद्यापीठाला राष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्याकरीता जी धोरणे आखलीत, ती सर्वांकरिता दिशादर्शक ठरली आहेत.