‘गट्टाका’ या चित्रपटातील काही ओळी शेअर करताना शाहरुखने लिहिले, ‘मी परत पोहण्यासाठी काहीही वाचवलं नाही. मला वाटतं की आयुष्यही असंच आहे. ते काही पुनरागमनाची योजना आखण्यासाठी नाहीये. इथे फक्त पुढे जायचं आहे. मागे येऊ नका. तुम्ही जे सुरू केले ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. एक ५७ वर्ष जुन्या सल्लाची गोष्ट.’ किंग खानने त्याच्या पोस्टमध्ये नेहमी पुढे जात राहा म्हटल्याचं त्याच्या चाहत्यांनी सांगितलं. तसेच ‘पठाण’चं यश म्हणजे सिनेमावर बहिष्कार टाकणाऱ्यांच्या तोंडावर चपराक असल्याचेही चाहत्यांचे म्हणणे आहे.
यापूर्वी शाहरुख खानने ‘पठाण’ शैलीत देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. सिनेमातला संवाद लिहित त्याने ट्वीट केले होते की, ‘तू देशासाठी काय करू शकतोस… सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा. आपल्या संविधानाने आपल्याला जे काही दिले आहे ते आपण जपले पाहिजे आणि आपल्या देशाला नवीन उंचीवर नेले पाहिजे. जय हिंद.’
‘पठाण’ सिनेमा २५ जानेवारीला विरोधादरम्यान प्रदर्शित झाला होता
पठाण सिनेमाला प्रदर्शनापूर्वी मोठ्या विरोधाचा सामना करावा लागला होता. बॉयकॉट गँग सोशल मीडियावरही सक्रिय होती आणि मागील काही सिनेमांप्रमाणेच या सिनेमावरही बहिष्कार टाकून फ्लॉप करण्याची त्यांची योजना होती, परंतु शाहरुखच्या चाहत्यांनी त्या सर्वांवर मात केली.
‘पठाण’ने दोन दिवसांत २०० कोटींहून अधिक कमाई केली
‘पठाण’ हा पहिला बॉलिवूड सिनेमा आहे, ज्याने हा पराक्रम केला. सिनेमाने अवघ्या २ दिवसांत जगभरात २०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. शाहरुख खानशिवाय सिनेमात दीपिका पदुकोण, जॉन अब्राहम यांच्याही भूमिका आहेत.