Airtel ने लाँच केले दोन स्वस्त प्लान, ६० जीबी पर्यंत मिळतोय डेटा, अनलिमिटेड कॉलिंग

नवी दिल्लीः New Airtel Plans Launched: Bharti Airtel ने आपल्या ग्राहकांसाठी दोन नवीन प्रीपेड प्लान लाँच केले आहेत. नवीन एअरटेल प्रीपेड प्लान मध्ये ६० जीबी पर्यंत डेटा ऑफर केला जात आहे. नवीन एअरटेल रिचार्ज प्लानमध्ये कंपनी जास्त डेटा ऑफर करीत आहे. परंतु, एअरटेलकडे अनेक सर्व अॅड ऑन डेटा ऑप्शन आहे. परंतु, खूप कमी प्लानमध्ये जास्त डेटा ऑपर करीत आहे. नवीन एअरटेल रिचार्ज प्लानला ४८९ रुपये आणि ५०९ रुपये किंमतीत लाँच करण्यात आले आहे. जाणून घ्या नवीन प्लान संबंधी.

Airtel Rs 489 plan details
४८९ रुपयाच्या एअरटेल प्लानची वैधता ३० दिवसाची आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉलची सुविधा मिळते. याशिवाय, या प्लानमध्ये ५० जीबी डेटा ऑफर केला जात आहे. या प्लानमध्ये एकूण ३०० एसएमएस ऑफर केले जात आहे. या रिचार्ज प्लान सोबत एअरटेल प्लानमध्ये अनेक बेनिफिट सुद्धा मिळतात. या प्लानमध्ये Hello Tunes, Wynk Music, फास्टॅगवर कॅशबॅक आणि Apollo 24|7 सर्कल सारखे फायदे मिळतात.

Airtel Rs 509 plan details
५०९ रुपयाच्या एअरटेल रिचार्ज प्लानमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड व्हाइस कॉल ऑफर केला जात आहे. म्हणजेच ग्राहकांना लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉल करता येवू शकतात. या प्लानची वैधता ३० दिवसाची आहे. या प्लानमध्ये ३०० एसएमएस मिळतात. याशिवाय, ६० जीबी डेटा या प्लानमध्ये मिळतो. याशिवाय, ग्राहकांना हॅलो ट्यून्स, विंक म्यूझिक, Apollo 24|7 सर्कल शिवाय, फास्टॅगवर कॅशबॅक बेनिफिट मिळतात.

वाचाः Airtel ग्राहकांना मोठा झटका, सर्वात स्वस्त प्लान बंद, आता द्यावे लागतील ५७ टक्के जास्त पैसे

भारती एअरटेलने नुकतेच अनेक प्रीपेड प्लानची घोषणा केली आहे. ५जी सपोर्टेड एरियात एअरटेल ग्राहक या प्लान सोबत ५जी स्पीडचे इंटरनेटचा वापर करू शकतात. एअरटेल सध्या दिल्ली एनसीआर, हरियाणा, जम्मू आणि काश्मीर, आंध्र प्रदेश, बिहार, आसाम, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, झारखंड सह अनेक राज्यात 5G Services ऑफर करीत आहे.

वाचाः ६ फेब्रुवारीला भारतात येतोय पोकोचा नवा स्मार्टफोन, पॉवरफुल फोनची किंमत किती?

९९ रुपयाचा सर्वात स्वस्त प्लान बंद
एअरटेलने आपला सर्वात स्वस्त बेसिक प्लानच्या किंमतीत ५७ टक्के वाढ केली आहे. एअरटेलने ९९ रुपयाचा प्लान आता बंद केला आहे. एअरटेलच्या प्लानची सुरुवात १५५ रुपयांपासून होते.

वाचाः Google Doodle on Republic Day : प्रजासत्ताक दिनानिमित्त गुगलने बनवले खास डूडल

Source link

Airtelairtel 5gairtel offerairtel plansairtel prepaid plansairtel recharge
Comments (0)
Add Comment