आमदार बच्चू कडू यांना आमदार बांगर यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याबाबत प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. हिंगोली येथील पॉलिटेक्निक महाविद्यालयातील प्राचार्यास मारहाण करून शासकिय कामात अडथळा आणल्याप्रकरणी आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलांनी विनयभंग छळवणूक होत असल्याची तक्रार केल्यानंतर आमदार बांगर यांनी या प्राचार्यांना मारहाण केली होती. यानंतर बांगर यांच्यासह ४० जणांविरोधात हिंगोली ग्रामीण पोलिसांनी शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
क्लिक करा आणि वाचा- ती तुरुंगवास भोगून बाहेर आली, लोकांनी घेतला धसका, गाठले पोलीस ठाणे…; कोण आहे नाझिया?
महाविद्यालयातील महिला प्राध्यापिका आणि महिला कर्मचाऱ्यांनी प्राचार्य डॉ. अशोक उपाध्याय यांच्याकडून आपला मानसिक छळ होत आहे, असा आरोप केला होता. त्यानंतर आमदार संतोष बांगर हे १८ जानेवारी रोजी महाविद्यालयात जाब विचारण्यासाठी गेले. तेथे आमदार संतोष बांगर यांनी प्राचार्यांना मारहाण केली. मारहाणीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता.
क्लिक करा आणि वाचा- ७० वर्षीय सासरेबुवांचे २८ वर्षीय सुनेवर मन बसलं, मंदिरात उरकलं लग्न; फोटो पाहून लोकांचं डोकं चक्रावलं
आज शनिवारी दाखल झाला गुन्हा
मारहाण प्रकरणी आज पहाटे प्राचार्य डॉ. अशोक उपाध्याय यांनी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. आमदार संतोष बांगर, शंकर बांगर यांच्यासह प्राध्यापक अशा ४० जणांनी प्राचार्यांच्या कक्षेत येऊन त्यांना शिवीगाळ करून मारहाण केल्याचे प्राचार्यांनी तक्रारीत म्हटले आहे. तसेच सीसीटीव्हीचे, डीव्हीआरच्या वायर तोडण्यात आल्या. यात पाच हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे त्यानी नमूद केले आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक आर. एन. मळघने, पोलीस उपनिरीक्षक मगन पवार पुढील तपास करीत आहेत.
क्लिक करा आणि वाचा- इंजेक्शनला घाबरणाऱ्यांसाठी मोठा दिलासा, संशोधक लवकरच तयार करणार तोंडावाटे घेण्याची लस