वाचा: नवीन आणि मोठ्या स्क्रीनचा स्मार्ट टीव्ही खरेदी करायचा असल्यास या भन्नाट डील्स एकदा पाहाच
टेक कंपन्या मायक्रो-एलईडी तंत्रज्ञान आणण्याच्या तयारीत:
यामध्ये मायक्रो एलईडी तंत्रज्ञान आणण्याचा मार्ग तयार केला जात आहे. महत्वाचे म्हणजे मायक्रो एलईडी तंत्रज्ञान एलईडीपेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. सध्या, एलईडी लाइट हा सर्वोत्तम मानला जातो, तो प्रकाश उद्योगात मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. याशिवाय, मायक्रो एलईडी सेमीकंडक्टरमधून वीज पाठवून प्रकाश निर्माण करतो. प्रकाश उत्सर्जित करणारा सेमीकंडक्टर हा खूपच म्हणजे अगदी जीवाणूएवढा लहान असतो. लाल, निळा आणि हिरवा प्रकाश या सूक्ष्मजीव आकाराच्या पिक्सेलमधूनच तयार होतो.
वाचा: या ब्रँडेड स्मार्टफोनवर मिळतोय मोठा डिस्काउंट, फीचर्स देखील आहे जबरदस्त
मायक्रोएलईडी डिस्प्लेमध्ये अनेक वैशिष्ट्ये असतात. या तंत्रज्ञानाद्वारे, आजच्या फ्लॅट पॅनेलच्या पडद्यांपेक्षा प्रति चौरस मिलिमीटर हजारपट जास्त प्रकाश निर्माण केला जाऊ शकतो. तंत्रज्ञानाच्या अनेक फायद्यांमुळे, प्रीमियम कंपनी Apple ने मायक्रो एलईडी स्क्रीन बनवण्यासाठी अब्जावधी डॉलर्स खर्च केले आहेत. रिपोर्ट्सनुसार, अॅपलने २०१४ पासूनच या तंत्रज्ञानावर काम करण्यास सुरुवात केली होती.
अॅपल आपले वॉच अल्ट्रा या उत्कृष्ट तंत्रज्ञानासह सादर करत आहे आणि असे मानले जात आहे की, या तंत्रज्ञानासह आणखी इतर उपकरणे देखील सादर केली जातील. पण, किमतीच्या बाबतीत हे नवीन तंत्रज्ञान खूप महाग असेल असेही सांगण्यात येत आहे. Google बद्दल बोलायचे झाले तर, कंपनीने 2022 मध्ये माहिती दिली होती. कंपनीने सांगितले होते की, त्यांनी मायक्रोएलईडी स्टार्टअप रॅक्सियम विकत घेतले आहे. मात्र, कंपनीकडून या तंत्रज्ञानाबाबत अधिक माहिती देण्यात आलेली नाही.
वाचा: Airtel युजर्स फ्रीमध्ये घ्या लाईव्ह TV, मुव्हीज आणि शोजची मजा, पाहा प्लान्स