स्वप्नं तशीच राहिली; चार महिन्यांपूर्वीच पोस्ट ऑफीसमध्ये नियुक्ती, प्रशिक्षणाला जाताना घात…

गडचिरोली: अहेरी तालुक्यातील वेलगुर टोल्याच्या वळणावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघे दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली. रवी किष्टे (२१) रा. परभणी आणि धोंडीपा पवार (२१) रा. नांदेड, असे अपघातात ठार झालेल्या युवकांची नावे असून यातील धोंडीपा पवार हे पोस्ट मास्टर आणि रवी किष्टे हे पोस्ट मॅन आहेत.

प्राप्त माहितीनुसार जिमलगट्टा पोस्ट ऑफिस अंतर्गत येणाऱ्या कम्मासूर येथे मागील चार महिन्यांपूर्वी धोंडीपा पवार आणि रवी किष्टे दोघेजण अनुक्रमे पोस्टमास्तर आणि पोस्टमन म्हणून रुजू झाले होते. २९ जानेवारी ते ३० जानेवारी पर्यंत (दोन दिवस) गडचिरोली येथे प्रशिक्षण असल्याने सहा दुचाकी घेऊन इतर सहकार्यांसोबत ते गडचिरोलीला जात होते. पाच दुचाकी समोर निघून गेल्या होत्या.

हेही वाचा -लातूरमध्ये पुन्हा ‘श्रावणी’ नको, आई-वडिलांचा आक्रोश पाहावेना; त्या शिक्षकाला अटक करण्याची मागणी

धोंडीपा आणि रवी हे दोघे सर्वात शेवटी होते. बराच वेळ झाला, मात्र धोंडीपा आणि रवी काही आले नाही. म्हणून पुढे गेलेल्या सर्वांनी आपल्या गाड्या फिरवल्या आणि ते या दोघांना शोधायला निघाले. तेव्हा त्यांना आपल्या सहकाऱ्यांचा अपघात झाल्याचे दिसून आले. दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली असावी, असा अंदाज त्यांच्या सहकाऱ्याने व्यक्त केला आहे. या घटनेची माहिती मिळताच अहेरीचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरु आहे.

आलापल्ली ते आष्टी मार्गाची दुरावस्था झाली आहे. त्यातच जड वाहनांची वर्दळ असल्याने मागील एक वर्षांपासून अल्लापल्ली ते मुलचेरा या रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. आलापल्ली ते मुलचेरा मार्गावर मागील काही दिवसांपूर्वी नव्याने डांबरीकरण करण्यात आले होते. यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत झाला आहे. असे असले तरी या रस्त्याच्या साईडला बंब भरण्यात आले नसल्यामुळे सदर रस्त्यावरून आमने-सामने येणाऱ्या दोन वाहनांना रस्ता क्रॉस करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

हेही वाचा -जेली चॉकलेट बाळाच्या घशात अडकलं, आईनं प्रयत्नांची शर्थ केली, पण जे व्हायला नको तेच घडलं

त्यामुळे दुरुस्तीनंतरही साईड बंबचा कामाअभावी हा रस्ता जीवघेणा ठरत असल्याची ओरड या परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे. या गंभीर बाबीची दखल घेऊन माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी दोन्ही साईड लवकरात लवकर भरण्यात यावे, अशी मागणीही केली होती. मात्र, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचं दिसून येत आहे.

Source link

gadchiroli accidentgadchiroli newsgadchiroli todays newsnanded newsparbhani newspost office jobroad accidents in indiatwo lost life in accident gadchiroliyouth lost life in road accidentगडचिरोली बातम्या
Comments (0)
Add Comment