ती तुरुंगवास भोगून बाहेर आली, लोकांनी घेतला धसका, गाठले पोलीस ठाणे…; कोण आहे नाझिया?

बीड: भोंदूगिरी करून अनेकांची फसवणूक करणारी एक महिला तुरुंगवास भोगून आल्यानंतर स्थानिक नागरिकांनी तिला विरोध दर्शवला आहे. आपल्या भोदूगरीच्या माध्यमातून अनेकांची फसवणूक करून माया गोळा करणाऱ्या या महिलेला तडीपार करा अशी मागणी नागरिकांनी बीडच्या पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. या महिलेने आतापर्यंत १०० हून अधिक लोकांची फसवणूक केली होती. भोंदूगिरीच्या अशा प्रकरणांमध्ये या महिलेवर १८ गुन्हे दाखव करण्यात आले होते. ही महिला पुन्हा भोंदूगिरी सुरू करून अनेकांची फसवणूक करेल अशी भिती नागरिकांना वाटत आहे. याच कारणासाठी नागरिकांनी तडीपारीची मागणी केली आहे.

बीड शहरात राहणाऱ्या या महिलेचे नाव नाझिया शेख असे आहे. तुरुंगवासाची शिक्षा भोगून आल्यानंतर ही महिला पुन्हा आपली भोंदूगिरी सुरू करेल अशी नागरिकांनी भिती आहे. म्हणूनच भीतीपोटी एकत्र येत नागरिकांनी पोलीस अधीक्षकांना निवेदनाद्वारे या महिलेला बीड जिल्ह्यातून तडीपार करण्यात यावं अशी मागणी केली आहे.

क्लिक करा आणि वाचा- ७० वर्षीय सासरेबुवांचे २८ वर्षीय सुनेवर मन बसलं, मंदिरात उरकलं लग्न; फोटो पाहून लोकांचं डोकं चक्रावलं

कोण आहे नाझिया शेख?

आपल्या विविध समस्या सोडवण्यासाठी अनेक लोक भोंदू बाबांच्या नादी लागतात. नाझिया शेख ही अशीच एक भोंदूगिरी करणारी महिला. आपल्या जादूटोणा, करणीबाधा अशा स्वरुपाच्या गोष्टींमधील ज्ञान असल्याचा दावा तिने केला होता. गुप्तधन कसे प्राप्त करावे, एखाद्यावर कोणी जादूटोणा केला असेल तर तो दूर कसा करावा, घरात कोणी मरणार असेल तर त्यासाठी पूजा कशी करावी, अशा प्रकारचे दावे ही महिला करत असे.

क्लिक करा आणि वाचा- इंजेक्शनला घाबरणाऱ्यांसाठी मोठा दिलासा, संशोधक लवकरच तयार करणार तोंडावाटे घेण्याची लस

नाझिया शेख हिच्यावर हळूहळू नागरिकांचा विश्वास बसू लागला. त्यानंतर नाझिया शेख हिचा दरबार भरू लागला. या भोंदूगिरीच्या माध्यमातून नाझिया शेखने लाखो रुपयांची माया गोळा केली होती. त्यासोबत काही गुंड देखील तिने स्वतःच्या आसपास ठेवायला सुरुवात केली. जर यामध्ये पैसे देण्यास कोणी नकार दिला किंवा पैसे दिलेच नाहीत तर त्या व्यक्तीला गुपचूप उचलून नेत मारहाण करून ते पैसे वसूल करण्याचे काम सुरू केलं होतं. काही लोकांनी विरोध दर्शविल्यानंतर तिने धमक्या देणेही सुरू केले. जर कोणी तक्रार करायचा प्रयत्न केला तर माझ्या जादूटोण्याने त्याचं घर उध्वस्त करीन अशा देखील अनेक धमक्या अनेक जणांना तिने दिल्या होत्या. याच भयभीती पोटी तिच्या विरोधात कोणी बोलायला तयार नव्हतं. मात्र काही जणांनी धाडस करून या महिलेच्या विरोधात तक्रार दाखल केली होती.

क्लिक करा आणि वाचा- हमाल दे धमाल! तुम्ही कधीच पाहिली नसेल हमालांची अशी स्पर्धा, ५० किलोचे साखरेचे पोते… अंतर १ किमी

या महिलेनेही जादूटोणा, करणी, विविध प्रकारच्या बाधांपासून लोकांची सुटका करण्याची दावा करत अनेकांची लाखो रुपयांना आर्थिक फसवणूक केली होती. तिच्या या फसवणुकीच्या त्रासाने अखेर नागकांनीच काही वर्षांपूर्वी तिच्या भोंदुगिरीचा पर्दाफाश केला होता. त्यांनंतर तिच्यावर १८ गुन्हे दाखल होत तिला अटक करण्यात आली. पुढे तिला तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली. आता मात्र ती तुरुंगवासाची शिक्षा भोगून आल्यानंतरही नागरिकांनी या महिलेला बीडमध्ये राहण्यास विरोध दर्शवला आहे.

Source link

beed newscheatingDemand of DeportingExpelfraudफसवणूकभोंदुगिरी
Comments (0)
Add Comment