Ormax ने लोकप्रिय स्पर्धकांची यादी जाहीर केली असून ज्यामध्ये जबरदस्त बदल दिसून आले. एमसी स्टॅन गेल्या दोन आठवड्यांपासून पहिल्या क्रमांकावर होता, तर या आठवड्यात प्रियंकाने बाजी मारली. गेल्या आठवड्यात प्रियंकाची अनेकांसोबत भांडणं झाली, शिव आणि निम्रितलाही ती भिडली. एके दिवशी तिचं अर्चनासोबत भांडणही झालं. या सगळ्यांमुळे ती कायम चर्चेत होती. त्यामुळे या आठवड्यात प्रियंका लोकप्रिय स्पर्धकांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे.
हे वाचा-वडिलांसमोरच नवऱ्याला किस केल्याने मसाबा गुप्ता ट्रोल; लिपलॉक Video Viral
ऑरमॅक्स मीडियाकडून दर आठवड्याला ही यादी जाहीर केली जाते. यावेळी जाहीर करण्यात आलेली यादी २१ जानेवारी ते २७ जानेवारीदरम्यानच्या लोकप्रिय स्पर्धकांची आहे. यावेळी टॉप ५ मध्ये अर्चनानेही एण्ट्री केली. अब्दू रोझिक घराबाहेर गेल्यानंतर अर्चनाला टॉप ५ मध्ये जागा मिळाली. याआधी नेहमी अब्दू, स्टॅन, शिव, टीना आणि प्रियंका टॉप ५ मध्ये असायचे. आता अब्दू बाहेर गेल्यानंतर टॉप ५ मध्ये अर्चना दिसू लागली आहे.
फिनालेला काही दिवस शिल्लक असताना फिरला गेम
१२ फेब्रुवारी रोजी बिग बॉस १६ ची अंतिम फेरी होणार असून त्याआधी अवघे काही दिवस शिल्लक असताना टॉप रँकिंगमध्ये मोठे बदल पाहायला मिळाले. प्रियंकाने शिवला पछाडल्याने त्याच्या चाहत्यांमध्ये निराशा आहे. ‘प्रियंका की पलटन’चे तीन स्पर्धक टॉप ५ मध्ये असून तर ‘शिव की मंडली’चे दोनच स्पर्धक टॉप ५ मध्ये आहेत. आता शिव पुढील आठवड्यात बाजी मारेल का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
कोण आहेत टॉप ५?
बिग बॉस १६ मध्ये गेल्या आठवड्यात लोकप्रियतेच्या बाबतीत पहिल्या क्रमाकांवर प्रियंका आहे, दुसऱ्या क्रमांकावर एमसी स्टॅन, तिसऱ्या स्थानी शिव, चौथ्या स्थानी अर्चना गौतम आणि पाचव्या स्थानी टीना दत्ता आहे. शिव तिसऱ्या स्थानी तर एमसी स्टॅन दुसऱ्या स्थानी आल्याने दोघांच्याही लोकप्रियतेमध्ये घसरण झाल्याचे चिन्ह आहे.