अर्थात भारतीय संविधान निर्मात्यांनी म्हणजेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी याच विचारातून प्रेरणा घेतल्याचे ते अभिमानाने सांगतात. कोकणातील आगरी कोळी कराडी भंडारी बारा बलुतेदार सागरपुत्रांची विवाहात हुंडा नाकारून स्त्री पुरुष समतेच्या तत्वाने, स्त्रियांना समाज जीवनात अत्यंत आदराचे स्थान देणाऱ्या आई एकवीरेंच्या मातृसत्ताक विचारांची प्रेरणा येथील एकविरा मातृस्थानात आहे. अर्थात कार्ला लेणी ही आई एकविरा या उत्तर कोकणच्या अपरांत प्रदेशातील मागील दोन हजार वर्षांची आंतरराष्ट्रीय मैत्री भावनेची सागरी संस्कृती सांगतात ती या परिसराच्या भौगोलिक रचनेचा अभ्यास केल्यास आपणास समजून येते.
तांबे नको म्हणत असताना भाजप पाठिंब्याच्या तयारीत, कोण कोणाला अडचणीत आणतंय?
रायगड ठाणे मुंबई येथील सरकारी गॅझेटचा अभ्यास केल्यास काही महत्वाच्या बाबी आपल्यासमोर येतात. कार्ले लेणी ही भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील आंतरराष्ट्रीय सागरी बंदरे बोरघाटाच्या मार्गे महाराष्ट्र आणि देशातील महत्वाच्या व्यापारी केंद्राशी जोडलेली होती. सम्राट अशोक, सातवाहन काळातील प्राचीन बंदरे मुरुड तळा, चौल रेवदंडा, पेण धरमतर खाडी, उरण पनवेल, उलवा, आगरोली, बेलापूर खाडी, मुंबई, ठाणे, कल्याण, सोपारा या सागरी व्यापारी मार्गाने जोडली होती. अर्थात आजची मासेमारी बंदरे आणि तेथील मातृसत्ताक सागरी संस्कृती यांचे अतूट ऐतिहासिक नाते आज आम्हाला छत्रपती शिवरायांच्या रयतेच्या स्वराज्यातील नौदलातील आगरी कोळी भंडारी सागरी सैनिकांच्या इतिहासापर्यंत घेऊन येते.
इ.स.पूर्व १ ले शतक ते इ.स. ५ वे शतक या काळात कार्ले लेणी दगडात खोदलेली आहेत. भारत सरकारने या लेणीला दिनांक २६ मे इ.स. १९०९ रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. साऱ्या भारतीयांसाठी आणि जगभरातील पर्यटक आणि अभ्यासकांसाठी हा अत्यंत मौल्यवान ठेवा आहेत. देशाच्या समस्त नागरिकांना संविधानिक समतेची जीवन मूल्ये सांगणारी ही शिल्पे आहेत. सत्व सांगणारी मातृसत्ताक आई एकविरा आणि माता प्रजापती या बौद्ध लेण्यातील भगवान बुद्धांच्या आई आणि मावशी आहेत. कार्ले लेण्यातील चैत्य स्तुपाला फेरी मारून आपल्या बालकांचे जावळ (डोक्यावरील केस) काढण्याचा बाळ संस्कार हा आगरी कोळी कराडी भंडारी सागरपुत्र आणि कार्ले लेणी यांचे २००० वर्षांचे सांस्कृतिक नातेसंबंध सांगत आहे.
कार्ले लेण्यात सर्वाधिक चैत्य आहेत. प्राचीन काळी ही लेणी वळूरक या नावाने ओळखली जात होती. बुद्धांच्या जीवनावर आधारित या दगडी कार्ले लेणी गुंफा हा १६ बौद्ध लेण्यांचा गट असून त्यातील एक चैत्यगृह व इतर विहार आहेत. चैत्यगृहाच्या दाराशीच डाव्या हाताला एक सिंहस्तंभ कोरला आहे.याच मालिकेतील सारनाथच्या धर्तीवर हा कार्ल्याचा स्तंभ कोरला आहे. हा स्तंभ ४५ फूट उंचीचा आहे. त्याची बैठक वर्तुळाकार आहे. त्याचे बाह्यांग सोळा कोनांचे आहे. या स्तंभाच्या अग्रभागी एक वर्तुळाकार कळस दिसून येतो.त्यावर आमलक हर्मीकेचा चौथरा आहे.या स्तंभावर चार सिहांची आकृती कोरली आहे.भारताच्या राजमुद्रेतील चार सिंह हे कार्ले लेण्यातील सिंहासारखेच असल्यामुळे साऱ्या महाराष्ट्रासाठी येथे हजारी वर्षे नित्यनेमाने येणाऱ्या एकविरापुत्र आगरी कोळी कराडी भंडारी आणि समस्त भारतीयांसाठी ही गौरवशाली गोष्ट आहे.
“वेजयंतीतो सेठींना भूतपालेंन सेलघरम परिणीठाप्रितम जंबु दिपमही उत्तमम” अर्थ वैजयंतीया श्रेष्ठी भूतपाल याने तयार केलेले हे लेणे जंबुद्विपात उत्कृष्ट आहे. ग्रीक अभ्यासकांनी या परिसराला भेटी दिल्याचे उल्लेख इतिहासात सापडतात. येथे एक जागतिक विद्यापीठ होते. महान साहित्यिक सेक्सपियर यांची झोपडी जतन करून त्यावर जगातल्या पर्यटकांकडून हजारो रुपयांचे चलन जमा करणाऱ्या देशाकडून आपण काही शिकले पाहिजे. जगातील अनेक देश हे केवळ पर्यटन उद्योगावर जगतात. भारत हा बौद्ध लेण्यांचा आणि भगवान बुद्ध यांच्या जन्माचा देश आहे. त्या महान जागतिक विचारांच्या मार्गदर्शकाची आई कोलीय मातृसत्ताक संस्कृतीतून येते. लग्नविधित धवळगीते गाणारी महिला पुरोहित ही आगरी कोळी संस्कृतीचे प्रतीक म्हणजे साऱ्या पुरुषसत्ताक धर्म पंथानी स्त्रियांना नाकारलेल्या धार्मिक राजकीय आर्थिक अधिकारांना चपराक देऊन महिला धर्मगुरू पुरोहिताचा मान देणारी महान माता प्रजापितेचे स्थान या कार्ले पवित्र भूमीत आहे.
स्वप्नं तशीच राहिली; चार महिन्यांपूर्वीच पोस्ट ऑफीसमध्ये नियुक्ती, प्रशिक्षणाला जाताना घात…
या देशाला भारतमाता म्हणणाऱ्या सरकारने २००० वर्षे जगाच्या इतिहासात पेरिप्लस टॉलेमी या इतिहास ग्रँथात गौरविलेल्या स्थानास विज्ञानाचे पुरातत्वीय आधाराने नव्याने तपासून त्याचे आदराने जतन करावे. भारत खरोखरच महागुरू आहे कारण जगात नाकारलेल्या स्त्री अधिकारांची पायाभूत मांडणी हे बौद्ध विचार आणि कार्ले लेण्यातील जागतिक सत्य आहे. निश्चितच कार्ले लेणी ही सर्वांसाठी सर्वश्रेष्ठ जीवन मूल्ये देणारी मानवी संस्कृतीच्या महान इतिहासातील पूजनीय लेणी आहेतच. परंतु आम्ही येणाऱ्या भावी पिढ्यांसाठी या राष्ट्रीय स्मारकाचा अर्थ सांगणारी काही पुस्तकांची दुकाने येथे थाटली तर उत्तमच होईल. शेती विषयक कायदे, दारू पिऊ नका हा पंचशील सांगणारा इंडियन पिनल कोड ते तरुणांना स्पर्धा परीक्षेला उपयुक्त सामान्य ज्ञान सांगणारे ग्रंथ, महान सम्राट अशोक ते माता जिजाऊंना आई एकविरा सारखा मोठा मान देणारा राजा त्यांनी बांधलेले किल्ले आरमार ते भारतीय स्वातंत्र्य समरातील महान योद्धे ते भारतीय संविधान अशी पुस्तके ठेवायला कुणाची हरकत नसावी.
जागतिक पर्यटक येथे येत आहेत. केंद्र आणि राज्य सरकारांनी आपल्या देशाच्या महान इतिहासाची माहिती देणारे संदर्भ साहित्य याची दालने येथे स्थापन करावीत. इतिहास अभ्यासक यांची राहण्याची सोय, पर्यटक यांच्यासाठी वाहन तळ, निवासाची सोय निर्माण व्हावी. कार्ला परिसर हे जागतिक राष्ट्रीय पर्यटन क्षेत्र जाहीर करून त्याचे नियोजन आंतरराष्ट्रीय दर्जाचे करावे. जागतिक स्तरावर बौद्ध विचार हाच जगण्याचा विचार आहे हे ब्रीदवाक्य घेऊन काम करणाऱ्या जपान थायलंड कोरिया व्हियतनाम कंबोडीया इत्यादी बुध्दीष्ट राष्ट्रांना निमंत्रित केल्यास तेही सहकार्य करू शकतात.
ज्यांचे पूर्वज येथे लेणी कोरण्यासाठी मेहनत घेऊन राबले त्या कष्टकरी हातांना पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होईल. मागच्या वर्षी येथील सर्व दुकानदार कष्टकरी लोकांची मी माझ्या सहकारी लोकांसोबत एक छोटी बैठक आयोजली होती. आज जर येथील दुकानाचे दिवसाला १०० रुपये उत्पन्न असेल तर येथील कार्ले लेणीच्या तीनशे एकरात जागतिक पर्यटन क्षेत्राचे नियोजन झाल्यास दिवसाला एक हजार रुपयांचे उत्पन्न येथील शेतकरी शेतमजूर यांना मिळू शकते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पर्यटनमंत्रीच नव्हे तर सारे मंत्रीमंडळ यांना विनंती की कार्ले लेणी ही महाराष्ट्राची आई एकविरा माता प्रजापती या मातृसत्ताक जिजाऊ सावित्री अहिल्या रमाई या स्त्रीसत्ताक मातृसत्ताक विचारांची उगमस्थाने आहेत.
जगात बंधूभाव पोहचवायचा असेल तर कार्ले लेणी या सारखे पवित्र ठिकाण साऱ्या भारतात नाही.अर्थात केंद्र सरकारलाही माझी विनंती आहे आपण राष्ट्रीय स्तरावर या लेण्यांचा विकास करावा. प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारी २०२३ कार्ले लेणी व आई एकविरा चरणी प्रथमच भारताच्या राष्ट्रध्वजास मानवंदना दिली गेली ही ऐतिहासिक घटना आहे. भारतीय संविधानाचे प्रास्ताविक व राष्ट्रगीत गाऊन समस्त नागरिकांना सामावून घेणाऱ्या, राष्ट्रनिर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समिती आणि उपस्थित एकविरा पुत्र आणि समस्त भारतमातेच्या तीन हजार बंधू भगिनी मुले मुली यांना या नव्या संविधानिक राष्ट्रीय कृती आणि दृष्टीसाठी त्रिवार वंदन!
विदर्भाच्या कापूस पंढरीत पांढऱ्या सोन्याला सर्वाधिक दर, नव्या बाजारभावामुळं शेतकऱ्यांना दिलासा