जया सावंत यांना ब्रेन ट्युमर झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांना मुंबईतील टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. बिग बॉस मराठी ४ च्या घरातून बाहेर पडल्यानंतर राखीने इन्स्टाग्रामवरून एक व्हिडिओ पोस्ट केला होता. यात तिने आई आयसीयूमध्ये असल्याचं सांगितलं होतं. राखीने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करताना चाहत्यांना तिच्या आईच्या आरोग्यासाठी प्रार्थना करण्याची विनंती केली होती. तिने लिहिले होते की, ‘आई रुग्णालयात आहे. तिची तब्येत बरी नाही तिच्यासाठी प्रार्थना करा.’
‘आईचं निधन झालं’ असं म्हणत स्वतः राखीने ई-टाइम्सला यासंबंधीची माहिती दिली. राखी सावंत म्हणाली की, ‘मल्टीऑर्गन फेल्युअरमुळे आईचं निधन झालं. आईचा कर्करोग किडनी आणि फुफ्फुसांमध्ये पसरलेला.’ यानंतर अभिनेत्री फार काही बोलू शकली नाही. राखीची आई जवळपास तीन वर्षांपासून कॅन्सरवर उपचार घेत होती.
२०२१ मध्ये करण्यात आलेले यशस्वी ऑपरेशन
राखी सावंतच्या आईचे एप्रिल २०२१ मध्ये कॅन्सरचे यशस्वी ऑपरेशन झाले होते. आईच्या यशस्वी ऑपरेशननंतर राखीने सलमान खान आणि सोहेल खान यांचे आभार मानले होते. त्यांनी राखीच्या आईच्या उपचाराचा खर्च उचलण्यास मदत केली होती.