लहान भावाचं करोनात निधन, आता मोठा भाऊ गेला; चांदूरकर कुटुंबाचं दु:ख बघून अख्खं गाव हळहळलं

अकोला : आपल्या पिकांचं नुकसान होऊ नये म्हणून शेतकरी रात्रीच्या अंधारात आपल्या जीवाची पर्वा न करता पिकांना पाणी द्यायला जातात. अनेकदा हे शेतकऱ्यांच्या जीवावरही बेतल्याचं समोर येतं. असाच काहीसा प्रकार अकोला जिल्ह्यात घडला आहे. आज शनिवारी पहाटे पाच वाजता शेतात एका शेतकऱ्याचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला.

शेतात गव्हाच्या पिकाला पाणी देण्यासाठी पाण्याची मोटर सुरू करण्यासाठी गेले. अचानक विद्युत बोर्डमध्ये बिघाड झाला आणि ही दुःखद घटना घडली. राजेश वासुदेव चांदूरकर असं या मयत शेतकऱ्याचे नाव आहे. मृतक राजेश चांदुरकर हे आई-वडिलांसह दोन कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे. कारण त्यांच्या लहान भावाचं करोनामुळे निधन झाल्यामुळे त्याच्या कुटुंबालाही ते सांभाळत होते. आता घरातील दोघेही कर्ते व्यक्ती गेल्याने चांदूरकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

तांबे नको म्हणत असताना भाजप पाठिंब्याच्या तयारीत, कोण कोणाला अडचणीत आणतंय?

नेमकं काय घडलं?

नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, अकोला जिल्ह्यातील भौरत गावात राजेश वासुदेव चांदुरकर (वय ४२) यांचं कुटुंब वास्तव्यास आहे. त्यांच्याकडे सहा एकर शेती असून त्यामध्ये गहू आणि हरभरा पेरलेला आहे. दरम्यान, रब्बी हंगामातील गव्हाला सध्या पाणी देणे सुरू आहे. राजेश हे नियमितप्रमाणे आजही पहाटे पाच वाजता शेतात गेले. गव्हाला पाणी देण्यासाठी पाण्याची मोटर सुरू केली. परंतू मोटर सुरू झाली नाही. मोटर का सुरू झाली नाही? हे पाहण्यासाठी राजेश हे विद्युत बोर्डाजवळ गेले.

विद्युत बोर्डाची पाहणी करत असताना अचानक त्यामध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि त्यांना जोरदार विजेचा शॉक लागला. या घटनेत राजेश चांदुरकर यांचा जागीच मृत्यू झाला. याची माहिती गावकऱ्यांसह कुटुंबियांना समजतात त्यांनी शेतात धाव घेतली. याशिवाय डाबकी रोड पोलिसही घटनास्थळी दाखल झाले होते. या प्रकरणी डाबकी रोड पोलीस ठाण्यात अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान, राजेश चांदुरकर यांचे लहान भाऊ देविदास चांदुरकर यांचं करोना काळात निधन झालं. त्यांना करोनाची लागण झाली होती. त्यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी, एक मुलगा, एक मुलगी यांची जबाबदारी घरातील मोठा भाऊ राजेश यांच्या खांद्यावर आली. तेव्हापासून आई, वडील, स्वतःसह लहान भावाचं कुटुंब राजेश हे सांभाळायचे. आता चांदुरकर कुटुंबातील प्रमुख कर्ता व्यक्ती राजेश गेल्याने अख्खा कुटुंबावर मोठं संकट उभं राहिलं आहे.

सोयाबीनच्या दरात घसरण पण शेतकऱ्यांना रेशीम शेतीनं तारलं, रेशीम कोष विक्रीतून चांगले पैसे

Source link

akola farmer dies in farmakola farmer dies of shockakola local marathi newsakola local newsअकोला लोकल बातम्याअकोला लोकल मराठी बातम्याअकोला शेतकऱ्याचा शेतात मृत्यूअकोला शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू
Comments (0)
Add Comment