बिग बॉस मराठीतून बाहेर पडल्यानंतरच राखीने तिच्या आईच्या ब्रेन ट्युमरविषयी माहिती दिलेली. अनेकदा ती पापाराझींच्या कॅमेऱ्यात रडताना कैद झाली. दरम्यान शनिवारी जुहू याठिकाणी असणाऱ्या क्रिटीकेअर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. यावंतर राखीची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. राखी जेव्हा बिग बॉस १५ मध्ये आलेली तेव्हाच तिच्या आईचे कॅन्सरवरील ऑपरेशन झाले होते. २०२१ मध्ये झालेल्या जया यांच्या ऑपरेशनसाठी अभिनेता सलमान खान आणि सोहेल खान यांनी मदत केल्याचे समोर आलेले. त्यानंतर २०२३ मध्ये तिच्या आईला ब्रेन ट्युमर झाल्याचे निदान झाले.
हे वाचा-आईच्या काळजीने तिळतिळ तुटलेली राखी सावंत, Video खूप रडवेल
जाणून घ्या राखीच्या कुटुंबाविषयी
राखी सावंतचे मुळ नाव नीरू भेडा असून तिच्या आईने आनंद सावंत यांच्यासोबत दुसरे लग्न केलेले. ते मुंबईतील वरळी पोलीस ठाण्यात कॉन्स्टेबल होते. राखी त्यांचेच आडनाव लावायची. आनंद यांच्यासोबत राखीचा कोणताही फोटो कधी समोर आलेला नाही. मीडिया रिपोर्टनुसार अभिनेत्रीने एकदा सांगितले होते की चालत्या ट्रेनमध्ये हृदयविकाराचा झटका आल्याने २०१२ साली त्यांचे निधन झाले होते. त्यावेळी ते ऑन ड्युटी होते.
शिवाय मीडिया रिपोर्टनुसार राखीचा राकेश सावंत नावाचा एक भाऊही आहे, तर उषा सावंत नावाची तिची बहीणही आहे. मात्र हे भाऊ-बहीण कधी एकत्र स्पॉट झालेले नाहीत.
हे वाचा-शाहरुखच्या ‘पठाण’ नावाच्या वादळातही रितेशच्या ‘वेड’चा बोलबाला! किती झाली कमाई?
राखी सावंतची लग्न
राखीने २०१९ साली एनआरआय असणाऱ्या रितेशशी लग्न केल्याचा दावा केलेला. रितेश अनेकदा तिच्यासोबत स्पॉट झालेला, तो तिच्यासोबत बिग बॉसमध्येही आलेला. मात्र २०२२ मध्ये ते विभक्त झाले. त्यानंतर राखीच्या आयुष्यात आदिल खान दुर्रानीची एन्ट्री झाली. २०२२ मध्ये रितेशपासून वेगळी झाल्यानंतर ती आदिलसोबत अनेकदा एकत्र दिसली. पापाराझींसमोर तो तिचा बॉयफ्रेंड असल्याचेही अभिनेत्रीने अनेकदा सांगितले होते. २०२२ मध्ये त्यांनी रजिस्टर पद्धतीने लग्न केले होते. याबाबतचे सारे पुरावे आणि फोटो तिने २०२३ मध्ये सर्वांसोबत शेअर केले होते. वर्षाच्या सुरुवातीला या घटनेमुळे राखी विशेष चर्चेत होती.