मुख्यमंत्री उद्या सांगलीत दाखल होणार; पूरबाधित गावांची करणार पाहणी

हायलाइट्स:

  • उद्धव ठाकरे सोमवारी सांगली जिल्ह्यातील पूरबाधित गावांची करणार पाहणी
  • सांगलीत आढावा बैठक झाल्यानंतर होणार पत्रकार परिषद
  • पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मोठी घोषणा करणार?

सांगली : महापुराने कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये मोठं नुकसान झालं आहे. या भागाला सावरण्यासाठी शासकीय यंत्रणा कार्यरत असून पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) विविध ठिकाणी जात आहेत. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे सोमवारी सांगली जिल्ह्यातील पूरबाधित गावांची पाहणी करणार आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सकाळी साडेनऊच्या सुमारास ते विमानाने कोल्हापूर विमानतळावर पोहोचतील. यानंतर हेलिकॉप्टरने सांगली जिल्ह्यातील पलूसपर्यंत पोहोचणार आहेत. पलूस तालुक्यातील भिलवडी परिसरातील पूर बाधित क्षेत्राची ते पाहणी करणार आहेत. यानंतर कसबे डिग्रज येथे पुराने झालेल्या नुकसानीची पाहणी करून मुख्यमंत्री सांगलीत पोहोचणार आहेत. सांगलीत आढावा बैठक झाल्यानंतर त्यांची पत्रकार परिषद होईल, अशी माहिती जिल्हा माहिती कार्यालयाने दिली आहे.

चिंता वाढली! राज्यात करोनामुक्त रुग्णांच्या संख्येत घट

सांगली जिल्ह्यात अतिवृष्टी व महापुरामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

कसा असेल मुख्यमंत्र्यांचा दौरा?

सकाळी ९.५० वा. मुंबईहून कोल्हापूर विमानतळ येथे आगमन.

सकाळी १०.५५ वा. भिलवडी, ता-पलूस येथे मोटारीने आगमन व पुरामुळे बाधीत भागाची पाहणी व नागरिकांशी संवाद.

सकाळी ११.१० वा. अंकलखोप, ता-पलूस येथे आगमन व पुरामुळे बाधीत भागाची पाहणी व नागरिकांशी संवाद.

सकाळी ११.५५ वा. कसबे डिग्रज येथे आगमन व पुरामुळे बाधीत भागाची पाहणी.

दुपारी १२.१० वा. मौजे डिग्रज, येथे आगमन व पुरामुळे बाधीत भागाची पाहणी.

दुपारी १२.३० वा. आयर्विन पुल, येथे आगमन व पुरामुळे बाधीत भागाची पाहणी.

दुपारी १२.४५ वा. हरभट रोड, सांगली येथे आगमन व पुरामुळे बाधीत भागाची पाहणी.

दुपारी १ वा. जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली येथे आगमन व जिल्ह्यातील पूरपरिस्थितीबाबत आढावा बैठक व पत्रकार परिषद.

दुपारी १.५० वा. भारती विद्यापीठ, भारती मेडकल कॉलेज कॅम्पस येथे आगमन व राखीव.

दुपारी ३.३५ वा. विमानाने मुंबईकडे प्रयाण.

दरम्यान, या पाहणी दौऱ्यानंतर पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मोठी घोषणा करणार का, याकडे पूरग्रस्त भागातील नागरिकांचं लक्ष लागलं आहे.

Source link

cm uddav thackeraysangali floodsangali newsमुख्यमंत्री उद्धव ठाकरेसांगलीसांगली पूर
Comments (0)
Add Comment