मित्रासोबत गावच्या यात्रेत गेला दोन दिवसांनी विहिरीत आढळला मृतदेह; घातपात की आत्महत्या?

बुलढाणाः गाव खेड्यामध्ये आजही अनेक उत्सव पारंपारिक पद्धतीने साजरे केले जातात. त्यातच दोन वर्षाच्या करोनाच्या कालखंडानंतर आता मोठ्या उत्साहात परिसरात यात्रा महोत्सव साजरा केला जात आहे. अशीच बुलडाणा जिल्ह्यातील कोलारा यात्रा करता गेलेला युवक घरून तर निघाला पण पुन्हा परत आलाच नाही. शोध सुरू झाला पण शेवटी मिळाला तो मृतदेह. नेमकं काय झालं जाणून घेऊया. (Buldhana Crime News)

२८ वर्षीय तरुण २६ जानेवारी रोजी मित्रांसोबत कोलारा येथील यात्रेला गेला होता .परंतु यात्रा झाली तरी घरी परत आलाच नाही. आई-वडिलांनी शोध घेतला असता कुठेही सापडला नाही. शेवटी आई-वडिलांनी गावकऱ्यांकडे मदत मागितलीत तेव्हा सगळीकडे शोधाशोध सुरू झाली. त्याचवेळी गावालगत असलेल्या एका विहिरीत मुलाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला. ही घटना २८ जानेवारी रोजी दुपारी उघडकीस आली.

गांगलगाव येथील रहिवासी अशोक डोंगरे यांचा २८ वर्षे मुलगा विजय उर्फ सोनू डोंगरे हा २६ जानेवारी रोजी कोलारा येथील यात्रेला जात आहे. असे सांगून मित्रांसोबत निघून गेला होता. यात्रा संपूनही घरी परतला नाही. म्हणून आई-वडिलांनी त्यांचे मित्र नातेवाईक तसेच आजूबाजूच्या गावात दोन दिवस शोध घेतला असता. तो कुठेही सापडला नाही. २८ जानेवारीला दुपारी वडील शोध घेत असताना. गावालगत अशोक आरख यांच्या विहिरीमध्ये मुलाचे प्रेत तरंगलेले दिसून आले.

वाचाः लहानपणीच रातआंधळेपणा, परिस्थिती बिकट; लोकशाहीचा भन्नाट अर्थ सांगणारा चिमुकला आहे तरी कोण?

हा प्रकार पाहून गावत एकच खळबळ माजली व मोठ्या- मोठ्याने आरडा ओरड सुरू झाली. आवाज ऐकून गावकरी घटनास्थळी मोठ्या संख्येने गोळा झाले. या घटनेची माहिती पोलीस पाटील यांनी अंढेरा पोलीस स्टेशनला दिली. माहिती मिळताच तात्काळ ठाणेदार गणेश हिवरकर, दुय्यम ठाणेदार मनोज वासाडे ,समाधान झीने, पोफळे ,गजानन वाघ यांनी घटनास्थळी गाव घेऊन पंचासमक्ष पंचनामा केला आहे. पण एकंदरीत अचानक एका युवकाचे प्रेत गावालगतच्या विहिरीत सापडल्याने खळबळ माजली आहे. हा घातपात आहे की आत्महत्या याचा तपास सुरू आहे.

वाचाः शुभांगीच्या हत्या प्रकरणात महत्त्वाची अपडेट; पोलिसांना ओढ्यात आढळली हाडे, तपासाला वेग

Source link

Buldhana Crime newsbuldhana news todaybuldhana youth diedबुलढाणा आजच्या बातम्याबुलढाणा ताज्या बातम्या
Comments (0)
Add Comment