हे वाचा-शाहरुखच्या ‘पठाण’ नावाच्या वादळातही रितेशच्या ‘वेड’चा बोलबाला! किती झाली कमाई?
२०० कोटींचा टप्पा पार
Sacnilk च्या रिपोर्टनुसार, पठाणने चौथ्या दिवशी देशभरात ५५ कोटींची (हिंदी, तामिळ आणि तेलुगू तिन्ही भाषेतील व्हर्जनची कमाई) कमाई करत २०० कोटींचा आकडा पार केला. ‘पठाण’ची चार दिवसातील एकूण कमाई २२१ कोटींची झाली आहे. पहिल्या दिवशीही पठाणने ५७ कोटींची कमाई केली होती, दुसऱ्या दिवशी हा आकडा ७०.५ कोटींवर पोहोचला. मात्र तिसऱ्या दिवशी कलेक्शन काहीसे नरमले होते, तिसऱ्या दिवशी पठाणने ३९.२५ कोटींचा गल्ला जमवला. मात्र चौथ्या दिवशी सिनेमाला वीकेंडचा फायदा झाला. पठाणची चौथ्या दिवसाची कमाई ५५ कोटी इतकी आहे.
दरम्यान या वेबसाइटवर असा अंदाज व्यक्त केला जात आहे की रविवारी (२९ जानेवारी २०२३) रोजी पठाण ६५ कोटींचा गल्ला कमावू शकेल. यानंतर पठाणचे एकूण कलेक्शन भारतात पाचव्याच दिवशी २८० कोटींवर पोहोचेल.
हे वाचा-Tiranga: राजकुमार यांच्यासोबत काम करायचं नव्हतं! या अटीवर नानांनी दिला होकार
पठाण आता पहिल्या वीकेंडपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे सिनेमासाठी पहिला रविवारही खास असेल. आतापर्यंत टॉप वीकेंड फिल्मचा रेकॉर्ड केजीएफ चॅप्टर २ च्या हिंदी व्हर्जनच्या नावावर होता. या सिनेमाने पहिल्या वीकेंडपर्यंत १४० कोटींची कमाई केली होती. दुसऱ्या क्रमांकावर बाहुबली २ चे हिंदी व्हर्जन होते, या सिनेमाने १२७ कोटींची कमाई केली आहे. वीकेंडपर्यंत पठाणच्या हिंदी व्हर्जनची कमाई २१४ कोटी इतकी आहे. त्यामुळे पठाणने आता या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. रविवारी हा आकडा २५० कोटींच्या पार जाईल असा अंदाज आहे.