अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक, एक ठार एक जखमी
लव्हाळा ते साखरखेर्डा मार्गावर सवडद फाट्याजवळील पुलाजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. साखरखेर्डा येथील दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. तर दहा वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली. साखरखेर्डा येथील लक्ष्मण फकीरा साबळे (वय वर्ष २५) आणि पल्लवी गोफने (वर्ष १०) हे दोघे २६ जानेवारीला रात्री आठ वाजेच्या सुमारास नारायण खेड येथे जात होते. साखरखेर्डा मार्गावरील भोगावती आणि कोराडी नदीवरील पुलाचे काम सुरू आहे. यावेळी लक्ष्मण साबळे हा कोराडी नदीवरील तात्पुरत्या रपट्याच्या पुलावरून येत असताना अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यात लक्ष्मण साबळेला गंभीर दुखापत झाली. रात्रीची वेळ असल्याने रहदारी तुरळ प्रमाणात होती. त्यामुळे त्यांना वेळेत मदत मिळाली नाही. दरम्यान अकोला ते किनगाव बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी साखरखेर्डा पोलीस ठाण्यात संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यानंतर बीट जमादार अनिल वाघ यांनी घटनास्थळी धाव घेऊन पल्लवी गोफणे हिला बुलढाणा येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. लक्ष्मण साबळे या तरुणाला शासकीय रुग्णालयात दाखल केले. पण त्याला मृत घोषित केले.
मित्रासोबत गावच्या यात्रेत गेला दोन दिवसांनी विहिरीत आढळला मृतदेह; घातपात की आत्महत्या?
फलक लावला नाही
लव्हाळा ते साखरखेडा मार्गावर तीन ठिकाणी पुलाचे काम सुरू आहे. या ठिकाणी तशी सूचना देणारा फलक लावण्यात आलेला नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याचा फलक येथे लावला असता तर त्यांचा अपघात झाला नसता, असेही वाहनचालकांचे म्हणणे आहे.
घरचे वाट पाहत बसले, पण त्याच्याऐवजी बातमी आली निधनाची, पिकअपच्या धडकेत