Pune : सोने, चांदीच्या हव्यासातून मित्राला संपवलं, मृतदेह ड्रममध्ये टाकून घर बांधण्याच्या जागेत पुरला

पुणे : वेल्हे तालुक्यात काही दिवसांपूर्वी शिवीगाळ केल्याच्या रागातून दोन भावांनी एका व्यक्तीचा लोखंडी रॉड, वीट आणि लोखंडी वस्तू डोक्यात मारून खून केला होता. आता या प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. संबधित व्यक्तीकडे असणाऱ्या सोने चांदीच्या हव्यासापोटी हा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपींकडून १ कोटी ८३ ला ७६ हजार १६५ रुपयांचे सोने-चांदीचे दागिने आणि रोख रक्कमचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

वेल्हे पोलिसांनी या प्रकरणी नितीन रामभाऊ निवांगुने, विजय दत्तात्रय निवांगुणे, ओमकार नितीन निवांगुणे आणि आणखी एक अशा चार जणांना ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलिसांनी माहिती दिली आहे. मृत विजय काळोखे याने घरातून निघताना सोबत सोने, चांदी आणि रोख रक्कम घेऊन गेल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली. यानंतर वेल्हे पोलिसांनी नितीन नीवांगुणे याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. तेव्हा त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

विजय प्रफुल्ल काळोखे हा सोने चांदीचे दागीने आणि रोख रक्कम घेवून घरी आला होता. ही माहिती त्यांना समजली. ते सोने-चांदीचे दागीने आणि रोख रक्कम पाहून हव्यासापोटी आरोपीने कात्रजमधील संतोषनगर येथे स्टीलच्या चिमटयाने विजय प्रफुल्ल काळोखे याच्या डोक्यात आणि तोंडावर मारून त्याला जबर जखमी करून त्याचा खून केला. आणि पुरावा नष्ट व्हावा, या उद्देशाने त्याचा मृतदेह प्लास्टिकच्या बॅरलमध्ये टाकला.

शिक्षकाकडून काळिमा फासणारे कृत्य; शारीरिक शिक्षणाच्या तासाला विद्यार्थिनींना…, नंतर असे मेसेज करायचा

मृतदेह असलेला प्लास्टीकचा बॅरल उचलून इनोव्हा कारमध्ये टाकून मौजे रानवडी (ता. वेल्हे, जि. पुणे) येथे आरोपी नितीन निवांगुणे याने शेतजमीन गट नं ४० मध्ये आरोपी विजय दत्तात्रय निवांगुणे याच्या मदतीने खड्ड्यात पुरला, अशी माहिती त्याने दिली. त्यानुसार पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेतले आहे. सोने-चांदी आणि मुद्देमाल आरोपींकडून पोलिसांनी जप्त केला आहे.

दशक्रिया विधी आटोपला, मात्र घरी परतताना डंपर काळ बनून आला; पुण्यात भीषण अपघात

Source link

katraj pune newskilled a friend in katraj for gold silver jewleryPune crime newsPune newspune news today
Comments (0)
Add Comment