रक्तदान शिबीर व महिलांची आरोग्य तपासणी शिबिराला उत्साहात सुरुवात

तेज पोलीस टाइम्स : परवेज शेख

रक्तदान शिबीर व महिलांची आरोग्य तपासणी शिबिराला उत्साहात सुरुवात
डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयामध्ये दि. 1 ते 15 ऑगस्ट महिला आरोग्य पंधरवडा साजरा करीत आहे.

पिंपरी दि. 1 ऑगस्ट 2021 – डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या प्र-कुलपती मा. डॉ. भाग्यश्रीताई पाटील, यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर व महिला आरोग्य शिबिराचे आयोजन पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय व संशोधन केंद्रामध्ये करण्यात येत आहे. या शिबिराच्या उदघाटन प्रसंगी माजी महापौर योगेश बहल, डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयाचे विश्वस्त डॉ. यशराज पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमरजित सिंग, अधिष्ठाता डॉ. जे. एस. भवाळकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. एच. एच. चव्हाण, सरचिटणीस विशाल काळभोर, एन आय पी एमचे संस्थापक व प्रथम अध्यक्ष अमोल कागवाडे, एन आय पी एम अध्यक्ष तुषार टोंगळे, एच आर कनेक्टचे अध्यक्ष संतोष चव्हाण, एच आर डिव्हाईनचे अध्यक्ष प्रीती साखरे, सुधीर दफ्तरदार आदी मान्यवर उपस्थित होते.

या शिबिराच्या पहिल्या दिवशी 71 रक्तदात्यांनी रक्तदान केले तसेच दोनशे महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. एन आय पी एम, पिंपरी, चिंचवड, चाकण चॅप्टर व एच आर कनेक्ट असोसिएशन तसेच एच आर डिव्हाईन यांच्या संयुक्त विद्यमानाने रक्तदान शिबिर घेण्यात आले. उदघाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवनाथ सूर्यवंशी तर आभार प्रदर्शन संतोष चव्हाण यांनी केले.

डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय आरोग्य पंधरवडा साजरा करीत असून दि. 1 ते 15 ऑगस्ट 2021 या कालावधीत सकाळी 9 ते दुपारी 3 वा या वेळेत महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिर होत आहे या पंधरवड्या अंतर्गत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी व हृदय शस्त्रक्रिया, गर्भाशयाच्या मुखाची कर्करोग तपासणी (पॅप स्मिअर टेस्ट) व शस्त्रक्रिया, स्तनांच्या कर्करोगाची तपासणी (मॅमोग्राफी टेस्ट ) व शस्त्रक्रिया तसेच कोरोना रॅपिड अँटीजन तपासणी आदींचा यात समावेश आहे. त्या करीता आवश्यक कागदपत्रे पिवळे व केशरी रेशनींग कार्ड, आधारकार्ड आणि पूर्व तपासणी केली असल्यास त्याचा अहवाल रुग्णांनी सोबत घेऊन त्यावेत.

अधिक माहितीसाठी डॉ.दर्शने- 9168259193, डॉ. सीमा – 9371894616, डॉ. श्रीकृष्ण 9860724041, फोन नं – 020 27805969 या क्रमांकावर संपर्क साधावा. मोफत आरोग्य शिबीरामध्ये गरजू महिला रुग्णांनी अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. डी. वाय पाटील रुग्णालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

एन आय पी एम पिंपरी, चिंचवड, चाकण चॅप्टर व एच आर कनेक्ट असोसिएशन तसेच एच आर डिव्हाईन चे सदस्य नवनाथ सूर्यवंशी, किशोर शिंदे, हेमंत ठाकूर, चेतन मुसळे, प्रदीप मानेकर, राहुल निंबाळकर, रमेश बागल, विनोद वढारे केतन खिवनसरा, अभय खुरसाळे, शिवाजी चोंडकर सुजित भोसले आदी रक्तदान शिबिरात सहभागी होते.

shifa Mobile : 9028293338

Comments (0)
Add Comment