धीरेंद्र महाराज काय म्हणाला?
संत तुकाराम महाराज यांना त्यांची पत्नी रोज मारहाण करायची. म्हणूनच त्यांनी देवाचा धावा केला. त्यांना विचारण्यात आलं, बायकोकडून मार खाता, तुम्हाला लाज वाटत नाही का? त्यावेळी महाराज म्हणाले. ही तर देवाची कृपा आहे. ती मला रोज मारते. जर मला प्रेम करणारी बायको मिळाली असती तर मी देवाचा धावाच केला नसता, अशी मुक्ताफळे धीरेंद्र महाराज याने उधळली आहेत.
धीरेंद्र महाराज याच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर सगळीकडून त्याच्यावर टीकेचा भडीमार होऊ लागला आहे. भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी धीरेंद्र महाराजाकडे माफीची मागणी केली आहे तसेच देहू संस्थानाने देखील धीरेंद्र महाराजाच्या बरळण्यावर टीका करत तत्काळ माफीची मागणी केली आहे.
केवळ वारकरी संप्रदायाचा नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान झाला आहे. त्यामुळे बागेश्वर धामच्या धीरेंद्र बाबाने माफी मागावी, अशी मागणी भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले यांनी केलीये.
“तुकोबांना घास भरवल्याशिवाय त्या अन्न, पाणी घेत नव्हत्या. डोंगराच्या ठिकाणी नामस्मरणात असलेल्या तुकोबांना त्या भाकरी खाऊ घालून यायच्या. पतीव्रतेची त्यामागची भूमिका त्यांची होती. त्यामुळे त्यांच्यावर चुकीचे वक्तव्य करू नयेत, असं देहू संस्थानचे विश्वस्त माणिक महाराज मोरे यांनी म्हटलंय.
कोण आहे धीरेंद्र महाराज?
- बागेश्वर महाराजांचं मूळ नाव धीरेंद्र रामकृपाल गर्ग.
- त्याचा जन्म 1996 साली झाला.
- मध्य प्रदेशातील छत्तरपूर जिल्ह्यातल्या गढा गावातला जन्म
- त्याच्या वडिलांचं नाव रामकृपाल गर्ग आणि आईचं नाव सरोज गर्ग.
- तीन भावंडांमध्ये धीरेंद्र हा सर्वात मोठा
- धीरेंद्र याचं शिक्षण केवळ बारावीपर्यंत झालंय