वडिलांना माओवाद्यांनी संपवले, मुलीने दाखवले धैर्य, रेड झोनमध्ये डॉक्टर म्हणून परतली, होतेय सर्वत्र कौतुक

गडचिरोली: इयत्ता बारावीच्या परीक्षेच्या एक दिवस आधी त्यांच्या वडिलांची नक्षलवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली तेव्हा त्या अवघ्या १७ वर्षांच्या होत्या. ब्रेन ट्युमरमधून वाचलेल्या या धीरोदात्त महिलेला आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. पण बाबा आमटे यांच्याकडून प्रेरणा घेऊन ती पुढे जात राहिली आणि तिने मग कधीही हार मानली नाही. मुंबई आणि पुण्याची चकचकीत दुनिया आणि ग्लॅमर पाहिल्यानंतरही या आदिवासी मुलीने शहरातील आरामदायी जीवनशैलीशी जुळवून घेण्याचा विचार केला नाही. डॉ. भारती बोगमी (३९) असे इतरांच्या प्रेरणा बनलेल्या या डॉक्टर महिलेचे नाव आहे.

लग्नाच्या विविध जबाबदाऱ्यांनंतरही त्यांचे समाजसेवेतील समर्पण कमी होऊ शकले नाही. चार वर्षांपूर्वी डॉ. भारती बोगामी (३९) यांना डॉ. सतीश तिरणकर यांच्या रूपात काम करताना त्यांचा जीवनसाथी मिळाला. गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील काही दुर्गम आदिवासी गावांमध्ये प्राथमिक आरोग्य सेवा देण्यासाठी डॉ. सतीश हे भारती यांच्यासोबत काम करू लागले.

क्लिक करा आणि वाचा- Gautam Adani : आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपतीभोवती घोंघोवते आहे अडचणींचे वादळ, वाचा अदानींबाबत A to Z

गडचिरोलीत मलेरिया हे सर्वात मोठे आव्हान

हे डॉक्टर दाम्पत्य आता मारकनार उपकेंद्रात काम करत आहे. यात आरेवाडा प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत (PHC) सात गावांचा समावेश आहे. या पीएचसीच्या अखत्यारीत ५२ गावे आहेत. परंतु काही उपकेंद्रांमध्ये डॉक्टर उपलब्ध नाहीत. त्यामुळे हे जोडपे या अतिरिक्त गावांतील रुग्णांवर उपचार करत आहेत.

गडचिरोलीत मलेरिया हे सर्वात मोठे आव्हान आहे. भामरागडच्या गावांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे. संपूर्ण राज्यात दरवर्षी मलेरियाचे सर्वाधिक रुग्ण जिल्ह्यात आढळतात. याशिवाय या भागांमध्ये साप आणि विंचू चावले आहेत असे रुग्णही आढळतात, अशी माहिती डॉ. भारती देतात. डॉ. भारती या माडिया जमातीतील आहेत.

क्लिक करा आणि वाचा- कमी गुंतवणुकीत मोठी कमाई करा, असे आहेत सोपे ५ मार्ग; जाणून घ्या श्रीमंत होण्याच्या बेस्ट टिप्स

‘मग खेड्यात राहणार कोण?’

भामरागडच्या लहरी गावातील रहिवासी असलेल्या डॉ. भारती २०११ मध्ये बीएसडीटी आयुर्वेद महाविद्यालय, पुणे येथून बीएएमएस पोस्ट इंटर्नशिप पूर्ण केल्यानंतर त्यांच्या गावी परतल्या. त्या सांगतात, ‘एटापल्ली आणि भामरागड तालुक्यांतील दोन आश्रमशाळांच्या आरोग्याची जबाबदारी माझ्याकडे सोपवण्यात आली होती. २०१५ मध्ये माझी नियुक्ती तहसीलच्या सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये झाली.

नंतर डॉ. भारती यांची मार्कनार उपकेंद्रात नियुक्ती झाली, जिथे खराब रस्त्यांबरोबरच टेलिकॉमच्या कनेक्टिव्हिटीच्या समस्येला तोंड द्यावे लागते. मायदेशी परतण्याच्या निर्णयावर डॉ भारती म्हणाल्या, ‘प्रत्येकाला शहरांमध्ये राहायचे असेल तर खेड्यात कोण काम करेल?. माझ्या समाजाला माझी गरज आहे. या समाजातील १० जणही डॉक्टर झाले तर उपचारापासून कोणीही दूर राहणार नाही.

क्लिक करा आणि वाचा- वाहनांच्या कर्कश आवाजांनी घेतले १४ हरणांचे बळी, जीव वाचवण्यासाठी घेतल्या होत्या उड्डाणपुलावरून उड्या

बाबा आमटे यांनी केले मार्गदर्शन

भारतीचे वडील मालू कोपा बोगमी २००२ मध्ये सरपंच आणि काँग्रेस कार्यकर्ते होते. डॉ. भारती यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न त्यांच्या अकाली निधनानंतर मोठ्या अडचणींना सामना करावा लागला. ती म्हणते, ‘त्यावेळी बाबा आमटे यांनी मला सांत्वन दिले आणि म्हणाले, भूतकाळातून शिक आणि पुढे जा. माझ्या वडिलांच्या निधनाच्या दुसऱ्या दिवशी मी परीक्षा दिली आणि आज मी समाजातील लोकांना मदत करत आहे.

Source link

Dr. Bharati BogamiGreat human serviceRed Zoneगडचिरोलीडॉ. भारती बोगमीनक्षलवादीरेड झोन
Comments (0)
Add Comment