तो आवाज माझा नाहीच, ती ऑडिओ क्लिप बनावट, धिरज लिंगाडेंचा पलटवार

बुलढाणा: काँग्रेस उमेदवार धिरज लिंगाडे यांनी विधानपरिषदेच्या अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत आपल्याला पदवीधर व पदवीधरांच्या विविध संघटनांचे मोठे समर्थन मिळत असल्याचा दावा केला आहे. प्रचारासाठी होणाऱ्या सभांना पाचही जिल्ह्यात पदवीधरांनी मोठी उपस्थिती दर्शविली, आता या निवडणुकीचा निकाल ही औपचारिकता आहे, असं लिंगाडे म्हणाले. महाविकास आघाडीच्या उमेदवाराला सभागृहात पाठविण्याचा निर्धार अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील पदवीधरांनी केला आहे. आपल्याला मिळणारे समर्थन पाहून विरोधक बैचेन आहेत, त्यांच्या झोपा उडाल्या आहेत, असंही लिंगाडे यांनी म्हटलं. विरोधकांना पोटशूळ उठला असून त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्याने आता खोटी ऑडिओ क्लिप व्हायरल करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जात आहे, असं लिंगाडे म्हणाले. व्हायरल होत असलेली ऑडिओ क्लिप खोटी असून “तो” आवाजच आपला नसल्याचे धिरज लिंगाडे यांनी स्पष्ट केले आहे.

काही वर्षांआधी विद्यमान आमदारांचा कार्यकर्ता असलेल्या एका अपक्ष उमेदवाराने व्हायरल केलेली ऑडिओ क्लिप पूर्णपणे खोटी आहे. तो आपला आवाजच नाही, याबद्दल काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्याशी आपले बोलणे झाले असून ऑडिओ क्लिप खोटी असल्याचे त्यांनाही सांगितले आहे, असं धिरज लिंगाडे म्हणाले.

दौंडच्या सात जणांच्या हत्येने महाराष्ट्र सुन्न, पुन्हा जिरेगावात बारामतीच्या युवकाचा मृतदेह?

पदवीधर मतदार सुजाण आहे. पदवीधरांच्या प्रश्नांवर काँग्रेस आणि महाविकास आघाडी हेच एकमेव उत्तर असल्याचे पदवीधर मतदारांना ज्ञात आहे. त्यामुळे विरोधकांनी कितीही खोडसाळपणा केला तरी लवकर त्यांना त्यांची जागा दाखवण्याचे काम पदवीधर मतदार करणार आहे असेही धिरज लिंगाडे यांनी म्हटले आहे.

पती आणि दोन मुलं घरी होती, पत्नी काम संपवून घरी आली, जे पाहिलं त्यानं पायाखालची जमीन सरकली

दरम्यान, विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी उद्या मतदान होणार आहे. नाशिक आणि अमरावती पदवीधर, नागपूर, औरंगाबाद आणि कोकण शिक्षक मतदारसंघात निवडणूक होत आहे. नाशिकमध्ये सत्यजीत तांबे आणि शुभांगी पाटील, औरंगाबादमध्ये विक्रम काळे आणि किरण पाटील, अमरावतीमध्ये रणजीत पाटील आणि धिरज लिंगाडे, कोकण शिक्षकमध्ये बाळाराम पाटील आणि ज्ञानेश्वर म्हात्रे आणि नागपूर शिक्षकमध्ये नागो गाणार ,राजेंद्र झाडे आणि सुधाकर अडबाले यांच्यात प्रमुख लढत होत आहे.

अंत्ययात्रेत मंगलाष्टका म्हटल्या, अक्षताही टाकल्या, पोराच्या जाण्याने आईवर नको ती वेळ…

Source link

congress newsdhiraj lingadedhiraj lingade newsMaharashtra newsmlc electionmlc election 2023mlc election newsmlc election update
Comments (0)
Add Comment