धीरेंद्र शास्त्री आम्ही तुम्हाला माफ करतो; देहू संस्थानचे वारकऱ्यांनाही मोठे आवाहन

देहू ( पुणे): संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल बागेश्रवर धामचे धीरेंद्र महाराज कृष्ण शास्त्री यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. बागेश्वर महाराजांच्या या वादग्रस्त वक्तव्याबाबत राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. देहू संस्थांचे विश्वस्त माणिक महाराज मोरे आणि नितीन महाराज मोरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ज्या तुकाराम महाराजांनी आयुष्यभर त्यागाची भूमिका घेतली त्यांच्या बाबतीत ऐकीव माहितीवर चुकीचे वक्तव्ये करू नयेत. अगोदर सविस्तर माहिती घ्यावी आणि मगच बोलावे. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी मंबाजी रामेश्वर भटाला माफ केले होते.वारकरी संप्रदाय हा सहिष्णू आहे. आम्हीही धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना माफ करतो. क्षमा करणे हा वारकऱ्यांचा सर्वात मोठा गुण आहे. तसेच वारकऱ्यांनी देखील या प्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त करू नयेत, असे माणिक महाराज मोरे यांनी म्हटले आहे.

संतांवर अशी वक्तव्ये होऊ नयेत म्हणून कायदा करा- माणिक महाराज मोरे

संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पत्नी या आमच्या मातोश्री आहेत. तुकोबारायांना त्यांनी घास दिल्याशिवाय स्वत: अन्नाचा कण घेतला नाही. तुकाराम महाराजांसाठी त्यांनी शेवटपर्यंत त्यागाची भूमिका घेतली. त्यांच्याबद्दल असे वक्तव्य करणे अत्यंत चुकीचे आहे, असे सांगतानाच अशा प्रकारे संतांवर कोणी बोलू नये म्हणून कायदा करणे आवश्यक असल्याचे मत देहू संस्थानचे विश्वस्त माणिक महाराज मोरे यांनी व्यक्त केले आहे. कायदा केल्यास अशा प्रकारच्या गोष्टींना पायबंद बसेल असेही ते म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा-हवेत उडत घेतला झेल, अचूक थ्रो करत केले धावबाद…; भारत अंडर-१९ वर्ल्ड चॅम्पियन बनण्यामागचं खरं कारण जाणून घ्या

तुकोबारायांच्या वाङ्‍मयाचा अर्थ भोंदू बाबाला कळला नाही- नितीन महाराज मोरे

ज्या माणसाला सर्व सामान्य माणसाच्या मनातलं काही कळत नाही, त्याला तुकोबारायांच्या मनातलं काय कळणार? संत तुकाराम महाराजांची उंची दाखवण्याचा त्याचा हेतू होता, मात्र संत तुकाराम महाराजांचे एवढे मोठे वाडमय आहे, त्याचा अर्थच या भोंदू बाबाला समजला नाही, अशी प्रतिक्रिया देहू संस्थानचे विश्वस्त नितीन महाराज मोरे यांनी दिली आहे.

संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल बागेश्रवर धामचे धीरेंद्र महाराज कृष्ण शास्त्री यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. बागेश्वर महाराजांच्या या वादग्रस्त वक्तव्याबाबत राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. देहू संस्थांचे विश्वस्त नितीन महाराज मोरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

क्लिक करा आणि वाचा- Gautam Adani : आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपतीभोवती घोंघोवते आहे अडचणींचे वादळ, वाचा अदानींबाबत A to Z

यावेळी नितीन महाराज मोरे म्हणाले की, आपल्याला ज्या व्यक्तीबद्दल पूर्ण माहिती नसेल तर त्या व्यक्तीबद्दल बेताल वक्तव्य करू नये. आई साहेबांच्या बाबतीत सांगायचं झालं तर तुकाराम महाराजांचा संसार आई साहेबांनी सांभाळला आहे. २१ व्या शतकात आपण वावरतो, आज आपली पत्नी आपल्याला नाव घेऊन हाक मारत नाही, आपली संस्कृती आहे तर चारशे वर्षांच्या पूर्वीची स्त्री असे करणारच नाही. तुकोबारायांना परमार्थाची मदत एवढी होती की, तुकोबाराय ज्या डोंगरावर असायचे त्या डोंगरावर आईसाहेब भाकरी घेऊन जायच्या. त्याचा परिणाम स्वरूप असा झाला की, तुकोबारायांच्या अगोदर पांडुरंगाने आईसाहेबांना दर्शन दिले होते. खरं तर असे बेताल वक्तव्य करणाऱ्यावर गुन्हे दाखल करायला हवेत.

क्लिक करा आणि वाचा- कमी गुंतवणुकीत मोठी कमाई करा, असे आहेत सोपे ५ मार्ग; जाणून घ्या श्रीमंत होण्याच्या बेस्ट टिप्स

त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत- नितीन महाराज मोरे

राज्यातील वारकऱ्यांनी शांतता राखावी आणि ती व्हायरल झालेली क्लिप आपल्या जवळच्या पोलिस स्टेशनला दाखवून त्यांच्यावर गुन्हे दखल करावे असे आवाहन नितीन महाराज मोरे यांनी केले आहे.

Source link

Dehu Sansthandhirendra maharajManik maharaj Moresant tukaram maharajदेहू संस्थानधीरेंद्र महाराजनितिन महाराज मोरेमाणिक महाराज मोरे
Comments (0)
Add Comment