यावेळी कार्यक्रमात मान्यवरांची भाषणदेखील झाली. त्याचसोबत सन्मानआरतीचा मान्यवरांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला होता. याच व्यसपीठावर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी भाषण केले. आणि भाजप महिला नेत्या चित्रा वाघ यांनी सुद्धा भाषण केले. या कार्यक्रमाल बहुसंख्य सामान्य महिलांनी उपस्थित लावली होती. त्यांना कार्यक्रमानंतर भाजपचं स्टिकर असलेल्या बागेत भेट वस्तू देण्यात आल्या होत्या. या बॅगवर भाजपचं चिन्ह आणि हेमंत रासनेच फोटो लावण्यात आले होता.
वाचाः महिलेने बाजारातून मासे आणले; मासे कापतानाच दिसली अशी गोष्ट की सगळेच हादरले
दरम्यान, आचारसंहितेचा भंग झाल्याचा आरोप होत असतानाच हेमंत रासने यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. खासगी कार्यक्रमात आचारसंहितेचे कोणतेही बंधन येत नाही. पोलिसांच्या सूचनेनुसार आम्ही झेंडेही काढून टाकले आहेत. मी आणि माझी पत्नी हा कार्यक्रम गेली १५ वर्ष घेत आहोत. आचारसंहितेचा नियम काय असतो. तो म्हणजे कार्यक्रम घेण्यावर बंदी नसते मात्र जो आपण खर्च करतो तो त्यांना दाखवावा लागतो, असं स्पष्टीकरण रासने यांनी दिलं आहे. तसंच, पत्रकारांनी तुम्ही पोटनिवडणुक लढवण्यास इच्छुक आहात का? हा प्रश्न विचारला असता त्यांनी मी २०१४पासून विधानसभा लढवण्याची तयारी करतोय. या संदर्भात काल देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत माजी भेट झाली. त्याचसोबत नितीन गडकरी, चंद्रकांत पाटील यांचीही भेट घेतली.