नायब तहसीलदार पतीच्या विवाहबाह्य संबंधामुळे वैफल्यग्रस्त, शिक्षिकेच्या मृत्यूचं गूढ उकललं

जालना : शहरातील मोती तलावाच्या चौपाटीवरून शनिवारी दुपारी स्वतःला झोकून देत जयश्री गणेश पोलास यांनी कौटुंबिक वादातून उडी घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी जयश्री पोलास यांच्या भावाच्या तक्रारी वरून आरोपी पती नायब तहसीलदार गणेश पोलास यांच्यावर चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. आज सोमवारी त्यांना न्यायालयात हजर करणार असल्याची माहिती मिळत आहे.

मयत जयश्री पोलास यांचे भाऊ संजय चिंतल यांनी दिलेल्या तक्रारीत, जयश्री यांचे सन २००० साली गणेश व्यंकटेश पोलास याच्यासोबत लग्न झालेले असून त्यांना सुदीप (वय २१ वर्ष) व सुजय (वय १७ वर्ष) अशी २ मुले आहेत. गणेश व्यंकटेश पोलास हे जयश्री हीस चांगली वागणूक देत होते. पण सन २०२० मध्ये गणेश पोलास यांचे परस्त्री सोबत संबंध असल्याचे जयश्री यांना कळाले. जयश्री यांनी गणेश पोलास यांना वारंवार समजावून सांगितले. पण गणेश पोलास याच्यावर काहीच फरक पडत नसल्याने जयश्री यांनी माहेरच्या व सासरच्या लोकांना सांगितले. तरीही त्याच्या वागण्यात काहीही फरक पडेना.

उलट तो पत्नीला शिवीगाळ करत मारहाण करू लागला. यामुळे नवरा बायकोत वारंवार खटके उडू लागले. गणेश याने जयश्री हिस मुद्दाम त्रास देण्यास सुरवात केली. अखेर २८ जानेवारी रोजी जयश्री हिने मोती तलाव जालना येथे उडी मारून आत्महत्या करुन जाचातून स्वतःला मुक्त केले.

या घटनेनंतर चंदनझिरा पोलीस ठाण्यात गणेश पोलास यांच्या विरुद्ध कलम ३०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. आज त्याला कोर्टापुढे हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, पुरवठा खात्यातील गणेश पोलास याचे एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याच्या चर्चेला पेव फुटले आहे.

Source link

jalna crime newsjalna newsnaib tehsildar ganesh polasnaib tehsildar immoral relationshipSuicide newsteacher suicide newsजालना क्राईमनायब तहसीलदारशिक्षिका आत्महत्या
Comments (0)
Add Comment