वाचा: Airtel युजर्स फ्रीमध्ये घ्या लाईव्ह TV, मुव्हीज आणि शोजची मजा, पाहा प्लान्स
Samsung Galaxy S22 Ultra चे फीचर्स
कंपनी फोनमध्ये ६.८ इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले देत आहे. डिस्प्ले 1700 nits च्या पीक ब्राइटनेस लेव्हलसह येतो. HDR10+ सह या फोनमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस+ संरक्षण देखील आहे. हा Samsung 5G फोन 12 GB रॅम आणि 256 GB अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज आहे. प्रोसेसर म्हणून यात स्नॅपड्रॅगन 8 Gen 1 प्रोसेसर आहे.
वाचा: २०० MP कॅमेरासह येणारे हे स्मार्टफोन्स आता बजेटमध्ये खरेदी करता येणार, पाहा लिस्ट
फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह चार कॅमेरे :
फोनच्या मागील बाजूस एलईडी फ्लॅशसह चार कॅमेरे आहेत. यामध्ये १२ मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल आणि १०८-मेगापिक्सेलच्या प्रायमरी लेन्ससह दोन १२ मेगापिक्सेल कॅमेरे समाविष्ट आहेत. त्याचबरोबर सेल्फीसाठी या फोनमध्ये तुम्हाला ४० मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. तुम्हाला या फोनमध्ये ५००० mAh ची बॅटरी इन-बिल्ट SPen सह मिळेल. ही बॅटरी ४५ W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. याशिवाय, तुम्हाला फोनमध्ये २५ W वायरलेस आणि १० W रिव्हर्स चार्जिंगसाठी देखील सपोर्ट मिळेल. फोन Android 12 वर काम करतो.
वाचा: बेस्ट डील ! स्वस्त झाला iPhone 14 Pro, पाहा कुठे मिळतेय ऑफर