पदवी प्रमाणपत्रावरची नावे तपासा, मुंबई विद्यापीठाचे विद्यार्थ्यांना आवाहन

म. टा. प्रतिनिधी

मुंबई : मुंबई विद्यापीठाने पदवी प्रमाणपत्रावरील मराठी नावे तपासणीसाठी विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून दिली आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ३० जानेवारी ते ८ फेब्रुवारीमध्ये विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रावरील तपशील पाहता येणार आहे. या नावांमध्ये काही चुका आढळल्यास विद्यार्थ्यांना त्या दुरुस्ती करून घेता येणार आहेत.

मुंबई विद्यापीठाचा दीक्षान्त समारंभ २३ फेब्रुवारीला पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर पदवी प्रमाणपत्रावरील देवनागरीतील नावे अचूक यावीत, तसेच त्यात काही चुका असल्यास त्या २३ फेब्रुवारी पूर्वी चुका दुरूस्त करून विद्यार्थ्यांना अचूक प्रमाणपत्र देता यावे, यासाठी विद्यापीठाने ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. विद्यापीठाने प्रथम सत्र २०२२मध्ये घेतलेल्या विविध पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांचा तपशील उपलब्ध करून दिला आहे.

विद्यार्थ्यांचे पदवी प्रमाणपत्रावर देवनागरीत लिहलेले नाव अचूक यावे म्हणून नावातील संभाव्य चुका टाळण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी व पडताळणीसाठी त्यांचा तपशील विद्यापीठाच्या www.mu.ac.in या संकेतस्थळावर ३० जानेवारी ते ८ फेब्रुवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत तपासणीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

सर्व विद्यार्थी आणि महाविद्यालयांनी विद्यापीठाच्या संकेतस्थळास भेट देऊन आपला मराठी नावाचा तपशील अचूक आहे का हे पाहावे, असे आवाहन विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रसाद कारंडे यांनी केले आहे.

SPPU Job: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ दहावी उत्तीर्णांना नोकरीची संधी

पुणे विद्यापीठात अर्ज प्रक्रिया

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत नुकताच १२१ वा पदवीदान समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर विद्यापीठामार्फत १२२ व्या पदवीदान समारंभामध्ये पदवी प्राप्त करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अर्जप्रक्रिया सुरू करण्यात आली असून, यासाठी १६ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज दाखल करता येणार आहे.

विद्यापीठामार्फत एप्रिल / मे २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना १२२ व्या पदवी प्रदान समारंभासाठी ऑनलाइन अर्ज करता येणार असल्याचे परीक्षा प्रमाणपत्र विभागामार्फत सांगण्यात आले आहे. यासाठी १६ जानेवारीपासून अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, १६ फेब्रुवारीपर्यंत नियमित शुल्कासह ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. तसेच विलंब शुल्कासह १७ ते २८ फेब्रुवारीदरम्यान अर्ज करता येणार आहे.

Success Story: न्यायालयातील‘हेड बेलिफ’चा मुलगा होणार न्यायाधीश
IDOL Admission: आयडॉलच्या जानेवारी सत्राच्या प्रवेशास सुरुवात

Source link

AppealCareer NewsDegree Certificateeducation newsmumbai universityMumbai University Degreeपदवी प्रमाणपत्रमुंबई विद्यापीठ
Comments (0)
Add Comment