BSNL 1198 Plan
BSNL चा ११९८ रुपयांचा प्रीपेड प्लान: तुम्हाला जर वर्षभराची वैधता असलेला प्लान हवा असेल तर, BSNL चा ११९८ रुपयांचा प्रीपेड प्लान चांगला पर्याय आहे. BSNL 1198 प्रीपेड प्लान ग्राहकांना ३६५ दिवसांची वैधता ऑफर करतो, ज्यामध्ये दरमहा ३०० मिनिटे कोणत्याही नेट व्हॉईस कॉल्स, दरमहा 3GB डेटा आणि दरमहा ३० SMS सारखे फायदे आहेत. व्हॉइस, डेटा आणि एसएमएस लाभ १२ महिन्यांसाठी मासिक क्रेडिट केले जातील. जर तुम्ही कमी वापरासह दुय्यम सिम रिचार्ज शोधत असाल तर हा प्लॅन तुमच्यासाठी चांगला पर्याय असू शकतो. प्लानचा रोजचा खर्च फक्त ३.२८ रुपये असेल.
BSNL 797 Plan
BSNL चा ७९७ रुपयांचा प्लान: सध्या मोठ्या प्रजासत्ताक दिनाच्या ऑफरचा एक भाग म्हणून ग्राहकांना ऑफर केला जात आहे, BSNL ७९७ रुपयांचा प्रीपेड प्लान ३६५ दिवसांच्या वैधतेसह दीर्घकालीन प्लान आहे. प्लान भारतातील कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित व्हॉईस कॉल (स्थानिक, STD आणि रोमिंग), दररोज १०० SMS आणि दररोज 2GB डेटा ऑफर करतो. दैनंदिन डेटा मर्यादा संपल्यानंतर, इंटरनेटचा वेग 40 Kbps पर्यंत कमी होतो. लक्षात ठेवा की डेटा, व्हॉइस आणि एसएमएस फायदे फक्त सुरुवातीच्या ६० दिवसांसाठी उपलब्ध असतील. प्लानचा रोजचा खर्च फक्त २.१८ रुपये असेल.
BSNL 397 Plan
बीएसएनएलचा ३९७ रुपयांचा प्रीपेड प्लान : BSNL का ३९७ रुपयांचा प्रीपेड प्लान युजर्सना १८० दिवसांची वैधता देते आणि दररोज 2GB डेटा ऑफर करते. 2GB डेटा मर्यादा संपल्यानंतर, अमर्यादित वापरासह वेग ४० Kbps पर्यंत कमी होतो. युजरला अमर्यादित व्हॉइस कॉल (स्थानिक / एसटीडीसह) आणि दररोज १०० एसएमएस देखील मिळतात. डेटा, व्हॉइस आणि एसएमएस फायदे ६० दिवसांसाठी उपलब्ध आहेत. प्लानचा रोजचा खर्च २.२० रुपये होईल. २०० दिवसांपर्यतची वैधता हवी असेल तर, हा प्लान तुमच्यासाठी बेस्ट आहे
BSNL 197 plan
बीएसएनएलचा १९७ रुपयांचा प्रीपेड प्लान : BSNL च्या १९७ रुपयांच्या प्रीपेड प्लानची वैधता ८४ दिवसांची आहे. प्लान ग्राहकांना ४० Kbps वर अनलिमिटेड वापरासह 2GB डेटा प्रतिदिन आणि अमर्यादित व्हॉइस आणि 100 SMS प्रतिदिन १८ दिवसांसाठी ऑफर करते. १८ दिवसांनंतर, ग्राहक सामान्य शुल्कात सेवांचा आनंद घेऊ शकतात. प्लॅनचा रोजचा खर्च २.३४ रुपये होईल.BSNL आपल्या ग्राहकांना अनेक फायद्यांसह प्रीपेड प्लान्स ऑफर करते. तसेच, BSNL प्लान ऑफर करते, जे इतर टेलको ऑफर करत नाही.
BSNL 107 Plan
BSNL चा १०७ रुपयांचा प्रीपेड प्लान: तुमचे बजेट सुमरे १०० रुपये असेल तर, BSNL चा १०७ रुपयांचा प्रीपेड प्लान तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. वैधतेबद्दल सांगायचे झाल्यास BSNL चा १०७ रुपयांचा प्रीपेड प्लान ४० दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लानमध्ये ३ GB डेटा, २०० मिनिटे व्हॉईस कॉलिंग आणि BSNL ट्यून ऑफर आहेत. हे एंट्री लेव्हल प्लान्स तुम्हाला ४० दिवसांची वैधता आणि व्हॉइस आणि डेटाचे बरेच फायदे देते. प्लॅनचा रोजचा खर्च फक्त २.६७ रुपये असेल.