सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पदवी प्रमाणपत्रासाठी अर्जप्रक्रिया सुरू

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत नुकताच १२१ वा पदवीदान समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर विद्यापीठामार्फत १२२ व्या पदवीदान समारंभामध्ये पदवी प्राप्त करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अर्जप्रक्रिया सुरू करण्यात आली असून, यासाठी १६ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज दाखल करता येणार आहे.

विद्यापीठामार्फत एप्रिल / मे २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना १२२ व्या पदवी प्रदान समारंभासाठी ऑनलाइन अर्ज करता येणार असल्याचे परीक्षा प्रमाणपत्र विभागामार्फत सांगण्यात आले आहे. यासाठी १६ जानेवारीपासून अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, १६ फेब्रुवारीपर्यंत नियमित शुल्कासह ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. तसेच विलंब शुल्कासह १७ ते २८ फेब्रुवारीदरम्यान अर्ज करता येणार आहे.

हे लक्षात असू द्या…
पदवी किंवा पदविका प्रमाणपत्र मिळण्यासाठी ऑनलाइन अर्ज दाखल केल्यानंतर विद्यार्थ्यांनी शुल्कासह त्यांच्या अंतिम वर्षाच्या गुणपत्रिकेची छायांकित प्रत अपलोड करणे आवश्यक असल्याचे परीक्षा प्रमाणपत्र विभागामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे. ऑक्टोबर/ नोव्हेंबर २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना नियमित पदवीदान समारंभात सहभागी होता येणार नसून, त्यांना पुरवणी पदवीदान समारंभासाठी अर्ज दाखल करावा लागणार आहे.

अर्जासाठीचे शुल्क

गेल्या पाच वर्षांत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पदवीदान समारंभासाठी अर्ज करण्यास व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी ३८५ रुपये, तर अव्यावसायिक अभ्यासक्रमासाठी २९० रुपये फी आकारली जाणार आहे. पाच वर्षांपूर्वी उत्तीर्ण झालेल्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी ७३५, तर अव्यावसायिक अभ्यासक्रमासाठी ५५० रुपये फी आकारली जाणार आहे. मुदतीनंतर अर्ज दाखल केल्यास व्यावसायिक अभ्यासक्रमास ३०० रुपये, तर अव्यावसायिक अभ्यासक्रमासाठी २२० रुपये विलंब शुल्क आकारले जाणार आहे.

SPPU Job: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ दहावी उत्तीर्णांना नोकरीची संधी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत नुकताच १२१ वा पदवीदान समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर विद्यापीठामार्फत १२२ व्या पदवीदान समारंभामध्ये पदवी प्राप्त करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अर्जप्रक्रिया सुरू करण्यात आली असून, यासाठी १६ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज दाखल करता येणार आहे.

विद्यापीठामार्फत एप्रिल / मे २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना १२२ व्या पदवी प्रदान समारंभासाठी ऑनलाइन अर्ज करता येणार असल्याचे परीक्षा प्रमाणपत्र विभागामार्फत सांगण्यात आले आहे. यासाठी १६ जानेवारीपासून अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, १६ फेब्रुवारीपर्यंत नियमित शुल्कासह ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. तसेच विलंब शुल्कासह १७ ते २८ फेब्रुवारीदरम्यान अर्ज करता येणार आहे.

हे लक्षात असू द्या..

पदवी किंवा पदविका प्रमाणपत्र मिळण्यासाठी ऑनलाइन अर्ज दाखल केल्यानंतर विद्यार्थ्यांनी शुल्कासह त्यांच्या अंतिम वर्षाच्या गुणपत्रिकेची छायांकित प्रत अपलोड करणे आवश्यक असल्याचे परीक्षा प्रमाणपत्र विभागामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे. ऑक्टोबर/ नोव्हेंबर २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना नियमित पदवीदान समारंभात सहभागी होता येणार नसून, त्यांना पुरवणी पदवीदान समारंभासाठी अर्ज दाखल करावा लागणार आहे.

अर्जासाठीचे शुल्क

गेल्या पाच वर्षांत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पदवीदान समारंभासाठी अर्ज करण्यास व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी ३८५ रुपये, तर अव्यावसायिक अभ्यासक्रमासाठी २९० रुपये फी आकारली जाणार आहे. पाच वर्षांपूर्वी उत्तीर्ण झालेल्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी ७३५, तर अव्यावसायिक अभ्यासक्रमासाठी ५५० रुपये फी आकारली जाणार आहे. मुदतीनंतर अर्ज दाखल केल्यास व्यावसायिक अभ्यासक्रमास ३०० रुपये, तर अव्यावसायिक अभ्यासक्रमासाठी २२० रुपये विलंब शुल्क आकारले जाणार आहे.

पदवी प्रमाणपत्रावरची नावे तपासा, मुंबई विद्यापीठाचे विद्यार्थ्यांना आवाहनIB Recruitment 2023: देशाच्या गुप्तचर विभागात बंपर भरती, दहावी उत्तीर्णांना नोकरीची संधी

Source link

Application process for degree certificate starts;पदवी प्रमाणपत्रासाठी अर्जप्रक्रिया सुरु | Maharashtra TimesSavitribai Phule Universitysppu
Comments (0)
Add Comment