जिओचा ३४९ रुपयाचा प्लान
जिओकडे एक ३४९ रुपयाचा प्री पेड प्लान आहे. यात रोज २.५ जीबी हाय स्पीड डेटा मिळतो. या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग मिळते. सर्व नेटवर्कसाठी आहे. जिओच्या या प्लानमध्ये रोज १०० एसएमएस मिळतात. या प्लानची वैधता ३० दिवसाची आहे. जिओच्या या प्लानमध्ये JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud ची फ्री मेंबरशीप मिळते.
वाचाः फोनवर फक्त एक मेसेज पाठवून लोकांच्या अकाउंटमधून काढले जाताहेत पैसे, या चुका टाळा
जिओचा ८९९ रुपयाचा प्लान
रिलायन्स जिओच्या या प्लानमध्ये तीन महिन्याची म्हणजेच ९० दिवसाची वैधता मिळते. या प्लानमध्ये सुद्धा रोज २.५ जीबी डेटा रोज मिळतो. ८९९ रुपयाच्या प्रीपेड प्लानमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि ९० दिवसासाठी रोज १०० एसएमएसची सुविधा मिळते. प्लान सोबत JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud ची फ्री मेंबरशीप मिळते.
वाचाः Airtel ने लाँच केले दोन स्वस्त प्लान, ६० जीबी पर्यंत मिळतोय डेटा, अनलिमिटेड कॉलिंग
एअरटेलकडे रोज २.५ जीबी डेटाचे अनेक प्लान आहेत. एक प्लान ३९९ रुपयाचा आहे. या प्लानची वैधता २८ दिवसाची आहे. यासोबत तीन महिन्यासाठी डिज्नी हॉटस्टारचे मोबाइल सब्सक्रिप्शन मिळते. तसेच ८४ दिवसासाठी अमेझॉन प्राइम मेंबरशीप मिळते. तसेच सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग मिळते.
वाचाः ही साइट विकतेय बनावट Apple प्रोडक्ट!, तुम्ही कुठून खरेदी केले, पाहा डिटेल्स