आजच्या व्यवस्थेचे रडगाणे आणी अण्णाभाऊंची वास्तववादी रचना

जळगाव जिल्हा | एरंडोल | संपादक :- शैलेश चौधरी

‘ही न्यायव्यवस्था काहीकांची रखेल झाली ! ही संसद देखिल हिजड्यांची हवेली झाली मी माझी व्यथा कोणाकडे मांडू कारण.. इथली व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली, ही रचना आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची पारंपरिक धार्मिक मूल्यांना छेद देणारे ऐतिहासिक विधान नोंदवून जगाकडे डोळस,वास्तववादी दृष्टिकोनातून बघण्याची शिकवण देणाऱ्या व आपल्या वरील विधानाप्रमाणे दलित-शोषित कष्टकरी चळवळीसोबत एकनिष्ठेनं राहणाऱ्या लोकशाहीर, साहित्यिक कॉ.अण्णा भाऊ साठे यांची आज जयंती.कॉम्रेड अण्णा भाऊ हे कामगार-कष्टकऱ्यांच्या चळवळीचे लोकशाहीर म्हणून अधिक नावाजले.परंतु तथाकथित,प्रस्थापित ब्राह्मणी साहित्य-संस्कृतीच्या ठेकेदारांनी व त्यांच्या समीक्षकांनी काँ.अण्णा भाऊ साठे यांचा साहित्यिक म्हणून उचित गौरव व सन्मान केला नाही. त्यांच्या वाट्याला १९६० च्या दशकापर्यंत म्हणजे दलित-आंबेडकरी-प्रगत साहित्याच्या चळवळीच्या उगमापर्यंत उपेक्षाच आली.ते ज्या जातवर्गीय समाजातून आले होते व त्यांनी ज्या दलित-शोषित,कष्टकरी जातवर्गीयांची वेदना,दाहक जीवन-वास्तव आपल्या साहित्यातून मांडले व प्रस्थापित समाजव्यवस्थेवर,संस्कृतीवर आपल्या लेखनातून, गाण्यांतून जे आसूड ओढले ते सत्तेवरील प्रस्थापित राज्यकर्त्यांना व त्यांची पालखी वाहणाऱ्या सांस्कृतिक क्षेत्रातील मक्तेदारांनाही रुचणारे नव्हते.अण्णा भाऊंचे वेगळेपण म्हणजे त्यांनी कुठलेही औपचारिक शालेय शिक्षण घेतले नव्हते. त्याबाबत ते एका ठिकाणी म्हणतात, ‘जे मी स्वत: जगलो आहे,पाहिलं आहे आणि अनुभवलं आहे, तेच मी शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्या साहित्यातील बऱ्याच व्यक्तिरेखा मला प्रत्यक्ष भेटलेल्या आहेत’अजूनही जातीयतेच्या आधारावर,ऐतखाऊ राजकारण्यांच्या कृपाकटाक्षाने गरीब-अमीर भेदाभेद,भ्रष्टाचार आपले अस्तित्व टीकवून आहे. ‘गरीबांवर उगारला जातो कायद्याचा बडगा तर धनदांडग्यांसाठी पुष्पगुच्छ्यांचा जुडगा,अशी तर्हा सर्वञ दिसते.ज्यांना स्वत:च्या भूतकाळाचा ठाव नाही असे राजकारणी विविध जाती-धर्मात तेढ निर्माण करून स्वत:च्या स्वार्थाची पोळी भाजून घेतांना दिसतात. कायद्याच्या कचाट्यात फक्त तुटपुंज्या अपेक्षेचे धनीच सापडतात.जिकडे-तिकडे भ्रष्टाचाराचा सूळसूळाट असल्यामुळे न्यायव्यवस्था ही काहीकांची रखेल झालीय. धनलोलूप सत्तापिपासू व षंढ राजकारण्यांमुळे संसद देखिल हिजड्यांची हवेली झालीय. ही व्यथा कोणाकडे मांडावी..इथली व्यवस्थाच पार भ्रष्टतेने रंगीन झालीय.. अण्णाभाऊंच्या रचनेतील एक ना एक शब्द खरा ठरलाय.. निवडणूकांचा बिगुल वाजल्यावर एक ना अनेक नाना तर्हेचे समाजकारण बाजूला ठेवून केवळ स्वार्थ साधण्यासाठी मतांचा जोगवा मागतात.भोळी-भाबडी जनता पोकळ आश्वासनांत गुरफटून निवडून देते. विविध खाती सांभाळत प्रशासनास आदेश देण्यात येतात.आणी सूरू होतो व्यवस्थेचा नंगानाच.दलित-शोषित कष्टकरींच्या नशीबी आजही मागासलेपणच.वाममार्गिय,अवैध धंदे चालतात नव्हे चालवले जातात. यांचे कनेक्शन प्रशासनापासून ते थेट राजकारण्यांपर्यंत असते.पैश्यामुळे कायद्याच्या चुलीत कोरडं कमी ओलंच जास्त जळतं.अन्याय फक्त शोषित कष्टकरींवरच.तेरी भी चूप और मेरी भी चूप म्हणवणार्या सत्ताधार्यांमुळे संसदेत हिजडेच वावरतात,अशी व्यवस्थेची व्यथा व रंजित कथा मांडावी तरी कोणाकडे? कारण ही व्यवस्थाच भ्रष्टतेने रंगीत,आच्छादीत आहे. हे तेव्हा ही सत्य होतं आणी आज ही खरंच आहे..त्यांच्या या जयंतीदिनी विनम्र अभिवादन.. 🙏🙏

–शैलेश चौधरी

Comments (0)
Add Comment