दरम्यान आता कंगनानं सिनेमाच्या विरोधात आघाडी उघडली आहे. पठाण सिनेमाच्या विरोधात पुन्हा कंगनानं ट्वीटची मालिकाच सुरू केली आहे. मात्र, कंगनाच्या या विरोधाला उर्फी जावेद हिनं चोख प्रत्युत्तर दिलं आहे. त्यामुळे दोघींमध्ये ट्विटर वॉर चांगलेच रंगले आहे. दोघींमध्ये नेमकं झालं काय जाणून घेऊ या…
हे वाचा-प्रसिद्ध कोरिओग्राफर विशाखा सुभेदारच्या डान्सवर फिदा; म्हणाली- आज दिन बन गया!
बॉलिवूडमधी निर्माती प्रिया गुप्ता यांनी पठाण सिनेमा सुरूअसताना सिनेमागृहातील व्हिडिओ ट्वीट केला आहे. यामध्ये पठाण सिनेमातील ‘झूमे जो पठाण’ गाणं वाजताना दिसत आहे. हे ट्वीट करताना प्रिया यांनी लिहिलं आहे की, ‘शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण पठाण सिनेमाच्या यशाबद्दल तुमचे अभिनंदन. याबरोबर हे देखील सिद्ध होत आहे की, हिंदू आणि मुस्लिम दोघंही जण SRK वर भरभरून प्रेम करत आहेत. दुसरं म्हणजे बहिष्कार मोहिमेनं सिनेमाला नुकसान नाही तर फायदाच झाला आहे. तिसरं म्हणजे सिनेमातील गाणी देखील तितकीच उत्तम आहे. चौथी गोष्ट म्हणजे भारत हा सर्वात धर्मनिरपेक्ष देश आहे’.
त्यावर कंगनानं केलं ट्वीट
प्रिया गुप्ता हिचं ट्विट कंगनानं रिट्विट करत लिहिलं आहे की, ‘खूपच छान विश्लेषण… या देशानं सर्व खानवर फक्त आणि फक्त प्रेमच केलं आहे. मुस्लिम अभिनेत्रींवरही लोक फिदा आहेत. त्यामुळे भारताकडून द्वेष पसरवला जातो हा आरोप पूर्णपणे चुकीचा आहे. भारतासारखा अन्य कोणताही देश जगात नाही.’
हे वाचा-भाऊनं करून दाखवलं! रितेशचा ‘वेड’ ७० कोटींच्या पार; बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ
उर्फीनं दिलं कंगनाला उत्तर
कंगनाने केलेल्या या ट्वीटवर उर्फी जावेद हिनं प्रतिक्रिया व्यक्त करत तिला चोख उत्तर दिलं आहे. उर्फीनं कंगनाचं ट्वीट रिट्वीट करत लिहिलं की, ‘अरे देवा… ही कसली विभागणी आहे? मुस्लिम कलाकार, हिंदू कलाकार. धर्माच्या नावावर कलेची विभागणी होऊ शकत नाही. इथं फक्त कलाकार आहेत.’
कंगनानं उर्फीला दिलं उत्तर
उर्फी जावेदनं केलेल्या या वक्तव्यानंतर गप्प बसेल ती कंगना कसली. तिनं उर्फीला प्रत्युत्तर देत आणखी एक ट्विट केलं. तिनं लिहिलं आहे की, ‘प्रिय उर्फी हे एका आदर्श जगात घडेल, पण जोपर्यंत देशात समान नागरिक कायदा येत नाही तोपर्यंत संविधानामध्येच देश विभागलेला आहे आणि राहील. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे २०२४ च्या जाहीरनाम्यामध्ये आपण सर्वांनी समान नागरिक संहितेची मागणी करूया… आपण करू शकतो का?’
अर्थात यावर उर्फीनं अद्याप उत्तर दिलेलं नाही. आता उर्फी नेमकं काय उत्तर देते याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.