मंदिरातील चोरीच्या वस्तू विकून मिळालेल्या पैशांतून हे आरोपी जुगार खेळायचे. आरोपी जैन मंदिरातून सोन्या-चांदीच्या पाट्या चोरत असत. क्राईम पेट्रोल या कार्यक्रमापासून प्रेरित होऊन या चोरी करत असल्याची कबुली आरोपीने दिली आहे. आरोपी हा जैन समाजाचा सदस्य म्हणून तसा पेहराव करतो आणि मुखवटा घालायचा, असं पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं.
दिंडोशीचे पोलीस अधिकारी धनंजय कवाडे मयांनी सांगितले की, मंदिरात प्रार्थना करण्याच्या बहाण्याने या चोरट्याने आणि मंदिराची रेकी केली आणि त्यानंतर त्याने सर्व मौल्यवान वस्तूंवर डल्ला मारला. त्यानंतर तो या सोन्या-चांदीच्या वस्तू विकून मिळालेल्या पैशांतून जुगार खेळायचा. या चोरट्याचे नाव भरत सुखराज दोशी असून तो रामचंद्र लेन, मालाड पश्चिम येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. या चोरट्याला पकडण्यासाठी पोलिसांनी १०० पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेजचा तपास केला.
आरोपी हा जैन उपासकाचे कपडे परिधान करुन घरातून निघून जायचा, त्यानंतर तो चोरी करायचा आणि मग चोरी केल्यानंतर तो सीसीटीव्ही कॅमेरे नसलेले मार्ग निवडायचा. २३ जानेवारीला जैन पुजारी धीरज लाल शाह यांनी जैन मंदिरातील १६० ग्रॅम सोन्याची प्लेट बेपत्ता असल्याची तक्रार दिंडोशी पोलिसांत दाखल केली. आरोपीच्या वेशामुळे त्याला शोधणं कठीण होतं. त्यामुळे पोलिसांना ९३ हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासावे लागले. त्यानंतर त्यांनी या चोरीचा छडा लावला.