श्रद्धेशी खेळू नका; धर्मांतराच्या मुद्द्यावर योगी आदिनाथ आक्रमक: बंजारा कुंभातून दिला इशारा

जळगाव : आम्ही कोणाला त्रास देत नाही अशी आमची भूमिका आहे. काही धर्म राजकीय उद्देशाने धर्मांतर करत आहेत. मात्र, धर्मांतरासाठी श्रद्धेशी खेळाल तर आम्ही सहन करणार नाही, असा इशाराच नाथ संप्रदायाचे व गोरक्षपीठाचे प्रमुख तथा उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदिनाथ यांनी आज दिला. जळगाव जिल्ह्यातील गोद्री येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय हिंदू गोरबंजारा लबाना नायकडा समाज कुंभाच्या सहाव्या व समारोपच्या दिवशी ते बोलत होते.

पुढे बोलतांना योगी आदिनाथ म्हणाले की, आम्हाला सर्वांना सनातन धर्मावर अभिमान असला पाहिजे. भारतामध्ये जन्माला येणे भाग्याचं लक्षण आहे. जगातला सर्वात प्राचीन धर्म असलेला सनातन धर्मात आपण जन्म घेतलाय. सनातन म्हणजेच मानवता धर्म आहे. सनातन धर्मात प्रत्येकाला सुरक्षेचे कवच असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

भारत वेगाने विकास करतोय, गेल्या आठ वर्षांत मोदींच्या नेतृत्त्वात भारत वेगाने प्रगती करतोय. भारत जगातील पाचवी विकसित अर्थव्यवस्था आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात भारताची अर्थव्यवस्था जगात नंबर वन होईल, यात शंका नाही, असेही ते पुढे म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा- ते ठरले अखेरचे देवदर्शन, रामेश्वरमहून परतताना भीषण अपघात; भोकरदन, बीडच्या भाविकांचा मृत्यू

राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डनचं नाव आता बदलण्यात आले. पुढील वर्षी पाचशे वर्षे वनवासात असलेले भव्य राममंदिर पूर्ण होऊन रामलल्ला तेथे विराजमान होईल अशी माहितीही त्यांनी दिली.

भारतात सांस्कृतिक, आध्यात्मिक संस्कृती जपली जात आहे. काही धर्म राजकीय उद्देशाने दुसऱ्या धर्मातील धर्मांतर करत आहेत. पण आपल्याला त्याच्याशी एकत्र येऊन लढा द्यायचा आहे. सगळे एकत्र येऊन धर्मांतर थांबवणं शक्य आहे. सर्व जण एकत्र आले तर जगातली कोणतीही ताकद आपल्या वेगळं करू शकत नाही. करोना काळात जगाने ही ताकद पाहिली असल्याचेही ते म्हणाले.

ब्रिटिश आणि मुघलांनी बंजारा समाजाच्या ताकदीला कमी करण्यासाठी प्रयत्न केले. पण ते शक्य झालं नाही. उत्तर प्रदेशमध्ये कुणीही धर्मांतर करू शकत नाही, केलं तर दहा वर्षे शिक्षा होते. पण घरवापसीला कायद्याची गरज नाही. बंजारा कुंभचा हा कार्यक्रम आदर्श म्हणून राष्ट्रीय स्तरावरून पुढे नेण्याची गरजही त्यांनी शेवटी विषद केली.

क्लिक करा आणि वाचा- नमणारही नाही, घाबरणारही नाही; आता सरपंचाला आली एसीबीची नोटीस, आमदार नाईक भडकले

यांची होती उपस्थिती

द्वारकापीठाधीश्वर श्री शंकराचार्य, योगगुरू रामदेव बाबा, महामंडलेश्वर जनार्दन महाराज, गोपाल चैतन्य महाराज (पालमश्रम), बाबूजी महाराज (पोहरादेवी)
भय्या जोशी, धर्म जागरण सभेचे प्रमुख शरद ढोले, शामकुमारजी यांच्यासह मुख्य संत महंत यांची उपस्थिती होती. तर शेजारी असलेल्या सभा मंडपातील व्यासपीठावर शिंदे गटाचे मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, भाजप नेते मंत्री गिरीश महाजन, आमदार चिमणराव पाटील, संजय सावकारे, मंगेश चव्हाण, लता सोनवणे, किशोर अप्पा पाटील, रक्षा खडसे, जयकुमार रावळ आदी उपस्थित होते.

दोन संविधानावर चालतो देश

यावेळी बोलतांना योगगुरू रामदेव बाबा म्हणाले की, हिंदू धर्म हा विश्व धर्म, युग धर्म आहे. आपला देश दोन संविधानावर चालतो. संविधानावर देश तर जीवन सनातन संविधानावर चालते, असे मत त्यांनी व्यक्त केले. आपला डीएनए सनातन धर्माचा आहे. कुणी लालच देऊन, प्रलोभन देऊन धर्मांतर करतो, हे आपल्याला शोभा देत नाही. धर्मांतर करू नका, ज्यांनी केलं त्यांना परत धर्मात आणूया असे आवाहन देखील रामदेव बाबा यांनी केले.

पूर्वी काही लोकांनी भेदभावची भिंती बांधल्या होत्या, पण आज संघटित व्हा, एकमेकांना मदत करण्याचा संकल्प करा.देशाला वाचवण्यासाठी आपण प्रयत्न करण्याचे आवाहनही रामदेव बाबा यांनी केले.

क्लिक करा आणि वाचा- Adani Group ला तीन दिवसांत सर्वात मोठा फटका, अब्जावधी डॉलरचे नुकसान, गौतम अदानी श्रीमंतांच्या यादीत आणखी घसरले

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री अनुपस्थित

दरम्यान या मेळाव्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघे एकाच विमानाने मेळाव्यासाठी मुंबईहून निघाले. मात्र दुपारी एक वाजता विमान तांत्रिक बिघाडाचे कारण देत दोघे माघारी परतल्याचे आयोजकांनी यावेळी जाहीर केले. कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे भाविकांशी संवाद साधला.

फत्तेपूर ते गोद्री रस्त्यावर शकडो एकर जागेवर मोठे मोठे सभामंडप उभारण्यात आले होते. मुख्य धर्मसभेसाठी ३ मोठे सभामंडप त्यात तीन व्यासपीठ मध्यस्थानी असलेल्या व्यासपीठावर द्वारकाधीशापीठ शंकराचार्य स्वतंत्र आसनावर विराजमान त्याच व्यासपीठावर रामदेव बाबा यांच्यासह योगी आदिनाथ, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री तसेच इतर पिठाचे मुख्य महंत उपस्थित होते. दुसऱ्या व्यासपीठावर सर्व राजकीय पदाधिकारी भाजप शिंदे गटाचे मंत्री आमदार व खासदार उपस्थित होते.तिसऱ्या व्यासपीठावर सर्व संत महंत उपस्थित होते. संपूर्ण धर्मसभेत जय सेवालाल व जय श्री राम चा जयघोष केला जात होता.

Source link

conversionYogi Adityanathगोरबंजारा लबाना नायकडा समाजधर्मांतरयोगी आदित्यनाथ
Comments (0)
Add Comment