गुणरत्न सदावर्ते यांचा निषेध
एसटी कष्टकरी जनसंघाचे नेते अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी ख्याजा गरीब नवाज यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे सोमवारी अकोल्यात संतप्त पडसाद उमटले. एसटी कष्टकरी जनसंघाचे गुणरत्न सदावर्ते यांच्या वक्तव्याचा एसटी कर्मचाऱ्यांकडून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी सदावर्तेंविरोधात आक्रमक भूमिका घेतली.
पाकिस्तान IPL शी स्पर्धा करायला गेला आणि तोंडावर आपटला, PSL बंद का होणार जाणून घ्या…
सदावर्तेंच्या संघटनेच्या पावत्या जाळल्या
महाराष्ट्रात सर्व धर्मीय गुण्या गोविंदाने नांदत आहेत. मात्र एखाद्या विशिष्ट धर्माच्या धर्मगुरु, मान्यवरांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणे चूक आहे, असं एसटी कर्मचारी म्हणाले. अॅड. गुणरत्न सदावर्दे यांनी ख्वाजा गरीब नवाज यांच्या बद्दल केलेले वक्तव्य वादग्रस्त असल्याचं एसटी कर्मचाऱ्यांनी म्हटलं. एसटी कर्मचाऱ्यांनी आज अकोला बस स्थानकाच्या आवारात एकत्र येत निषेध केला. तसेच एसटी कष्टकरी जनसंघाच्या पावत्यांची होळी करीत संताप व्यक्त केला.
मचाण आहे की घर? सोलर फॅन, लाईट, रेडिओ अन् बरंच काही; शेतकरी पुत्राची भन्नाट संकल्पना
एसटी संपानंतर सदावर्तेंकडून कामगार संघटनेची स्थापना
एसटी कर्मचाऱ्यांनी केलेला संप संपल्यानंतर गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी एसटी कष्टकरी जनसंघ या नव्या एसटी कामगार संघटनेची स्थापना केली होती. राज्यातील विविध आगारातील एसटी कर्मचारी त्यांच्या संघटनेचे सदस्य बनले होते. मात्र, त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळं अकोल्यातील एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. त्यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या संघटनेच्या पावत्या जाळल्या आहेत.
Pune News:’मिसळ पार्टी’ने महाविकास आघाडीचे टेन्शन वाढवले, कसबा पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट
नेहरूंनी महात्मा गांधींच्या विचारांचा खून केला, सदाभाऊ खोत यांचे वादग्रस्त वक्तव्य