RSS ची तालिबानशी तुलना, जावेद अख्तर यांना कोर्टात हजर राहावं लागणारच , वाचा काय आहे नेमकं प्रकरण?

मुंबई: गीतकार जावेद अख्तर यांची सेशन कोर्टात दाखल केलेली अंतिम स्थगितीची याचिका सेशन कोर्टाने फेटाळली आहे त्यामुळं आता जावेद अख्तर यांना सहा फेब्रुवारी रोजी मुलुंड न्यायालयात हजर राहावं लागणार आहे.

एका मुलाखतीमध्ये जावेद अख्तर यांनी आरएसएसची तुलना ही तालिबान्यांशी केली होती. यावर वकील संतोष दुबे यांनी आक्षेप नोंदवत जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जाहीर माफी मागावी अशी मागणी केली होती. परंतु त्यावर जावेद अख्तर यांच्याकडून कुठलीही प्रतिक्रिया न आल्यामुळं अखेर संतोष दुबे यांनी मुलुंड पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता.

या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान जावेद अख्तर यांना मुलुंड कोर्टानं समन्स जारी करत सहा फेब्रुवारी रोजी मुलुंड कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. या विरोधात जावेद अख्तर यांचे वकिलांनी सेशन कोर्टामध्ये अंतरिम स्थगिती मिळण्यासाठी याचिका केली होती परंतु आज सेशन कोर्टाने सुनावणी दरम्यान जावेद अख्तर यांची ही याचिका फेटाळली. त्यामुळं आता जावेद अख्तर यांना ६ फेब्रुवारी रोजी मुलुंड न्यायालयात सुनावणीसाठी हजर राहावं लागणार आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (आरएसएस) तुलना तालिबानशी केली होती. या विचारधारेचं समर्थन करणाऱ्या लोकांना त्यांनी आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला होता. एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अख्तर यांनी म्हटलं होतं की, आरएसएस, विहिंप आणि बजरंग दल आणि तालिबान सारख्या संघटनांच्या ध्येयांमध्ये कोणताही फरक नाही. या संघटनांच्या ध्येयाच्या मार्गात भारतीय संविधान एक अडथळा बनत आहे, परंतु जर संधी मिळाली तर ते घटनात्मक सीमाही ओलांडतील.

Source link

Javed AkhtarJaved Akhtar comparing RSS to Talibanjaved akhtar on rssRSSआरएसएसजावेद अख्तरराष्ट्रीय स्वयंसेवक संघ
Comments (0)
Add Comment