जालन्याच्या कार्तिकसाठी सरसावले मदतीचे हात, समाजाची संवेदनशील बाजू समोर

जालना : प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी लोकशाहीवर भाषण करुन राज्यभर व्हायरल झालेला कार्तिक वजीर चर्चेत आला कार्तिकच्या लोकशाहीवर भाषणामुळं अनेक जण मोक्कार हसले. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइननं कार्तिकचा शोध घेतला त्यावेळी त्याला रातआंधळेपणाचा त्रास असल्याचं समोर आलं. या बातमीनंतर अनेकांनी कार्तिकला मदतीची भूमिका मांडली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील कार्तिक वजीरची दखल घेतली. कार्तिक वजीर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जालना दौऱ्यावर आल्यानंतर त्यांना भेटायला जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांच्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्याच्याशी व्हिडिओ कॉलवरुन संवाद साधला. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कार्तिक वजीरची दखल घेण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील कार्तिक वजीरची दखल घेतली असून भाजपचे नेते सतीशराव घाटगे पाटील यांनी कार्तिकच्या घरी भेट दिली. २६ जानेवारी ला लोकशाही वर भाषण देणाऱ्या कार्तिक जालिंदर वजीरचा संपूर्ण शैक्षणिक खर्च आणि त्याला असलेल्या रात आंधळेपणानाचा औषध उपचाराचा खर्च समृध्दी साखर कारखान्याचे चेअरमन तथा भारतीय जनता पक्षाचे नेते आदरणीय सतीशराव घाटगे पाटील यांनी घेतला.

वर्ल्डकप जिंकत भावाची अखेरची इच्छा पूर्ण करणारी अर्चना देवी आहे तरी कोण, पाहा काय घडलं होतं

सतीशराव घाटगे पाटील यांनी रेवलगाव येथे जाऊन कार्तिक जालिंदर वजीर या चिमुकल्याची भेट घेतली. कार्तिक याने २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने लोकशाही वर शाळेमध्ये भाषण केले होते ते संपूर्ण सोशल मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात तुफान व्हायरल झाले. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइननं कार्तिकचा शोध लाऊन त्याची विचारपूस केली असता असं लक्षात आलं की कार्तिक अंत्यंत सर्वसाधारण कुटूंबातील असून त्याला रातआंधळेपणानाचा त्रास आहे. ही गोष्ट समजताच संवेदनशील व्यक्ती अशी ओळख असलेल्या सतीशराव घाटगे यांनी कार्तिक च्या घरी जाऊन त्याचे भाषणाबद्दल कौतुक केले. औषध उपचाराचा व शिक्षणाचा संपूर्ण खर्च करण्याचें आश्वासन दिले. या कामाबद्दल संपूर्ण परिसरातून समाधान व्यक्त केले जात आहे व सतिशराव घाटगे साहेब यांच्या संवेदनशील व्यक्तीमत्त्वाबाबत कौतुक केले जात आहे.

गुणरत्न सदावर्तेंच्या विरोधात एसटी कर्मचारीच मैदानात, थेट संघटनेच्या पावत्या जाळल्या, कारण समोर

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे मराठवाडा प्रमुख दादासाहेब थेटे यांनी आज मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे प्रमुख तसेच मुख्यमंत्री यांचे ओएसडी मंगेश चिवटे यांनी कार्तिकला व्हिडिओ कॉल वरून संपर्क साधला. कार्तिकच्या डोळ्याच्या उपचारांची पूर्ण जबाबदारी घेतली आहे.

Panvel News: घरी जाण्यासाठी रिक्षाच्या शोधात, पण नराधामांच्या तावडीत सापडली, पडीक इमारतीमध्ये नेऊन अत्याचार

Source link

CM Eknath Shindecmo video call to kartik vajirEknath Shindekartik vajirlokshahi speaker kartik vajirsatishrao ghatage patilएकनाथ शिंदेकार्तिक वजीरमंगेश चिवटे
Comments (0)
Add Comment