सेनगाव तालुक्यातील जयपूर येथील शेतकरी रामेश्वर शंकर पायघन व त्याचे भाऊ प्रकाश शंकर पायघन या दोन्ही भावांना ४० एकर शेती आहे. आणि विशेष म्हणजे हे सर्व कुटुंब एकत्र राहतात. यात रामेश्वर पायघन यांना एक मुलगी आणि दोन मुले आहेत. एका मुलीचे लग्न झाले आहे आणि एक मुलगा आता RTO इन्स्पेक्टर झाला आहे. तर, दुसरा मुलगा बीएएमएस करत आहे. शेतकरी आई- वडिलांनी दोन्ही मुलांना मोठ्या कष्टाने शिकवलं आहे. कुटुंबातील एक मुलगा RTO इन्स्पेक्टर झाल्यामुळं त्यांच्या कुटुंबाचे जिल्ह्याभरातून कौतुक केले जात आहे.
वाचाः आता औरंगाबाद ते पुणे गाठता येणार अवघ्या दोन तासांत; गडकरींनी सांगितला फ्यूचर प्लान
सहाय्यक मोटार वाहन निरिक्षक परिक्षा २०२० अंतर्गत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे शिफारसकेलेल्या उमेदवारांपैकी अमर रामेश्वर पायघन (मुळ प्रवर्ग OBC) (गुणवत्ता यादी क्र. ४५) यांना ओबीसी -४ या प्रवर्गातून एस-१४३८६००-१२२८००/- वेतनश्रेणीत, परिविक्षाधीन सहाय्यक मोटार वाहन निरिक्षक (गट-क) म्हणून, प्रादेशिक परिवहन कार्यालय यांचे कार्यालय नांदेड येथे नियुक्ती देण्यात आली आहे.
वाचाः पुण्यात पुर्ववैमन्यसातून दोन गटात तुफान राडा, बियरच्या बाटल्या फोडल्या, कोयते नाचवले; अंगावर काटा आणणार VIDEO
अमर पायघन यांचे प्राथमिक शिक्षण त्यांचं मूळ गाव जयपूर येथे पाहिली ते आठवीपर्यंत झाले आहे. त्यानंतरचे १० वी ते १२वीपर्यंतचे शिक्षण रिसोड येथे झाले. व नंतर त्यांनी पुणे येथे MPSC ची तयारी चालू केली व २०२० मध्ये त्यांनी MPSC परीक्षा दिली. या परीक्षेत त्याला यश मिळाले असून त्याची नांदेड येथे आरटीओ इन्स्पेक्टरपदी नियुक्ती झाली आहे. काही दिवसांतच ते ड्युटी जॉइन करणार आहेत.
वाचाः पोलिसांचा संशय खरा ठरला,चौकशीतला एक मुद्दा टर्निंग पॉईंट ठरला, मित्रांनीच प्रफुल्लला संपवलं