रिलायन्स जिओला मिळाले १४.२६ लाख ग्राहक
नोव्हेंबर २०२२ मध्ये जिओला १४.२६ लाख नवीन ग्राहक मिळाले आहेत. तर या महिन्यात एअरटेलच्या नेटवर्कने १०.५६ लाख नवीन ग्राहक जोडले आहे. आता रिलायन्स जिओच्या एकूण ग्राहकांची संख्या ४२.१३ कोटी झाली आहे. एअरटेलकडे आता ३६.६० कोटी ग्राहकांची सोबत आहे. या अवधीत वोडाफोन आयडियाला १८.२७ लाख ग्राहकांचे नुकसान झाले आहे. यानंतर कंपनीच्या एकूण ग्राहकांची संख्या २४.३७ कोटी झाली आहे.
वाचाः Airtel ने लाँच केले दोन स्वस्त प्लान, ६० जीबी पर्यंत मिळतोय डेटा, अनलिमिटेड कॉलिंग
TRAI च्या डेटा नुसार, देशात ब्रॉडबँड सब्सक्रायबर्सची संख्या वाढली आहे. नोव्हेंबर २०२२ च्या अखेरपर्यंत देशात एकूण ८२.५३ कोटी ब्रॉडबँड सब्सक्रायबर्स होते. याची संख्या महिन्याला ०.४७ टक्के ग्रोथ होती. टॉप पाच टेलिकॉम सर्विस प्रोव्हाइर्सचे नोव्हेंबरच्या अखेर पर्यंत ९८ टक्के हून जास्त मार्केट शेअर होते. यात जिओ जवळपास ४३ कोटी, एअरटेल जवळपास २३ कोटी, वोडाफोन आयडिया जवळपास १२.३ कोटी, आणि बीएसएनएल जवळपास २.६ कोटी आहे.
वाचाः फोनवर फक्त एक मेसेज पाठवून लोकांच्या अकाउंटमधून काढले जाताहेत पैसे, या चुका टाळा
एअरटेलचा प्री पेड प्लान झाला ५७ टक्के महाग
एअरटेलने नुकतेच आपल्या एन्ट्री लेवल प्लान १५५ रुपये केला आहे. बेसिक प्री पेड टॅरिफ जवळपास ५७ टक्के महाग झाला आहे. नवीन प्लान कर्नाटक, बिहार आणि राजस्थान सह ७ सर्कलसाठी जारी करण्यात आला आहे. आधी या प्लानची किंमत ९९ रुपये होती. आता हा प्लान बंद करण्यात आला असून याची किंमत १५५ रुपये करण्यात आली आहे.
वाचाः भारतातच नव्हे तर जगभरात चायना फोनची क्रेझ घसरली, IDC रिपोर्ट काय म्हणतोय पाहा