व्यवसायासाठी अर्धवट सोडले कॉलेज, गौतमी अदानींच्या शिक्षणाविषयी जाणून घ्या

Gautam Adani Education Details: गौतम अदानी यांचा जन्म २४ जून १९६२ रोजी अहमदाबाद, गुजरात येथे एका मध्यमवर्गीय जैन कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शांतीलाल आणि आईचे नाव शांती अदानी होते. त्यांचे वडील कापड व्यापारी होते. मात्र ते वडिलांच्या व्यवसायात सहभागी झाले नाहीत.

गौतम यांना एकूण सात भावंडे आहेत. त्यांच्या कुटुंबाने उदरनिर्वाहाच्या शोधात उत्तर गुजरातमधील थरड शहरातून स्थलांतर केले. त्यांच्या पत्नी प्रीती अदानी दंतचिकित्सक असून त्या अदानी फाऊंडेशनचे नेतृत्व करतात. त्यांना करण आणि जीत अदानी अशी दोन मुले आहेत.

PM Modi Education: पंतप्रधान नरेंद्र मोदी किती शिकले? जाणून घ्या
१९९८ मध्ये गौतम अदानी यांचे अपहरण करून त्यांना खंडणीच्या बदल्यात ओलीस ठेवले होते. ओलिसांना पैसे देऊन नंतर त्यांची सुटका करण्यात आली. इतकंच नाही तर २००८ च्या मुंबई हल्ल्यावेळी ते ताज हॉटेलमध्ये होते पण नंतर ते सुखरूप बचावले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींना किती मिळतो पगार? काय असतात सुविधा? सर्वकाही जाणून घ्या
कॉलेज ड्रॉपआऊट आहेत गौतम अदानी
गौतम अदानी यांना मोठी शैक्षणिक पार्श्वभूमी नाही. ते कॉलेज ड्रॉपआऊट आहेत. गुजरातमधील शेठ चिमणलाल नगिनदास शाळेतून त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्यांनी गुजरात विद्यापीठात बी.कॉमला प्रवेश घेतला. पण व्यवसायात रस असल्याने त्यांनी अवघ्या दोन वर्षांत कॉलेज सोडले. कॉलेज सोडल्यानंतर गौतम अदानी यांनी मुंबईतील महेंद्र ब्रदर्ससाठी डायमंड सॉर्टर म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली.
दीड रुपयामुळे वकील होण्याचे स्वप्न अपूर्णच; पत्रकार, समाजसुधारक, वक्ते प्रबोधनकार ठाकरे यांच्याविषयी जाणून घ्या

Source link

gautam adaniGautam Adani biographygautam adani businessGautam Adani careerGautam Adani EducationGautam Adani lifegautam adani net worthgk update Headlinesgk update Newsgk update News in HindiGK अपडेट SamacharLatest gk update Newsगौतम अदानीगौतम अदानी एज्युकेशनगौतम अदानी शिक्षण
Comments (0)
Add Comment