भांडुप संकुल येथील जलशुद्धीकरण केंद्रास अतिरिक्त ४,००० मिमी व्यासाची जलवाहिनी जोडण्याचे काम पालिकेद्वारे हाती घेण्यात येणार आले होते. तसेच भांडुप संकुलाशी संबंधित जलवाहिन्यांवर दोन ठिकाणी झडपा बसविणे, नवीन जलवाहिन्यांची जोडणी आणि दोन ठिकाणी गळती दुरुस्तीची कामे देखील हाती घेण्यात आली होती. तसंच, यासाठी ३० जानेवारी रोजी सकाळी १० ते ३१ रोजी सकाळी १० पर्यंत वांद्रे ते दहिसर पट्ट्यातील १२ विभागांत पाणीपुरवठा बंद राहणार होता. मात्र, आज ३१ जानेवारी रोजी सकाळी १० पर्यंत पूर्वपदावर न येता आज संध्याकाळी सहापासून पुर्वपदावर येणार असल्याची शक्यता आहे.
वाचाः बायको हरवल्याची तक्रार घेऊन गेला अन् अडकला; पोलिसांनी पतीलाच ठोकल्या बेड्या
भांडुप संकुल येथील १,९१० दश लक्ष लीटर प्रति दिन क्षमतेचे जल शुद्धीकरण केंद्र सुमारे ४२ वर्षानंतर प्रथमच २४ तासांसाठी बंद ठेवण्यात आले होते. ही सर्व कामे पूर्ण करीत असताना त्या दरम्यान बऱ्याच तांत्रिक अडचणी आल्या आहेत. त्यामुळे उपरोक्त कामे पूर्ण करून १,९१० दश लक्ष लीटर प्रति दिन क्षमतेचे जल शुद्धीकरण केंद्र, केंद्रापर्यंत येणाऱ्या व केंद्रापासून पुढे जाणाऱ्या सर्व जल वाहिन्या पूर्ण क्षमतेने सुरु करण्यासाठी आठ तासांचा अतिरिक्त कालावधी लागणार आहे, असं पालिकेने म्हटलं आहे.
पूर्वी जाहीर केल्याप्रमाणे उपरोक्त कामामुळे बाधित झालेल्या भागांचा पाणी पुरवठा दि. ३१ जानेवारी २०२३ रोजी सकाळी १०:०० वाजता पूर्वपदावर न येता तो संध्याकाळी ०६:०० पासून पूर्वपदावर येणे अपेक्षित आहे, असं पालिकेच्या जल अभियंता विभागाने नमूद केलं आहे.
वाचाः आता औरंगाबाद ते पुणे गाठता येणार अवघ्या दोन तासांत; गडकरींनी सांगितला फ्यूचर प्लान
या भागात पाणी नाही
पश्चिम उपनगर
– वांद्रे एच पूर्व आणि वांद्रे एच पश्चिम
– अंधेरी के पूर्व, अंधेरी के पश्चिम
– गोरेगाव पी दक्षिण
– मालाड पी उत्तर
– कांदिवली आर दक्षिण
– बोरिवली आर मध्य
– दहिसर आर उत्तर
वाचाः पठ्ठ्यानं करुन दाखवलं! शेतकरी कुटुंबातील मुलगा झाला RTO इन्स्पेक्टर
पूर्व उपनगर
– भांडुप एस
– घाटकोपर एन
– कुर्ला एल
या भागात २५ टक्के कपात
– दादर जी उत्तर
– वरळी जी दक्षिण
– माहीम पश्चिम
– दादर पश्चिम
– प्रभादेवी
– माटुंगा पश्चिम